• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • ganpati visarjan 2021 : मुंबईत विसर्जनाला गालबोट, वर्सोवा समुद्रात 3 मुलं बुडाली

ganpati visarjan 2021 : मुंबईत विसर्जनाला गालबोट, वर्सोवा समुद्रात 3 मुलं बुडाली

गणपती विसर्जनादरम्यान वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर रात्री 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

गणपती विसर्जनादरम्यान वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर रात्री 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

गणपती विसर्जनादरम्यान वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर रात्री 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

 • Share this:
  मुंबई, 19 सप्टेंबर :  'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत लाडक्या बाप्पाला भक्तीभावाने निरोप (ganpati visarjan 2021) देण्यात आला आहे. मुंबईत (mumbai) दिवसभरात शांततेत विसर्जन पार पडले. मात्र, वर्सोवाच्या समुद्रात 5 मुलं बुडाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने वेळीच 2 जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणपती विसर्जनादरम्यान वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर रात्री 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विसर्जन करत असताना 5 जण बुडाली. सुदैवाने वेळीच स्थानिक रहिवाश्यांनी धाव घेऊन २ मुलांना वाचवले आहे. पण, 3 जण बेपत्ता झाली आहे. जीवरक्षक, आणि अग्निशमन दलाच्या साहाय्याने शोध सुरू आहे.  तसंच, नौदलाची सुद्धा मदत मागण्यात आली आहे तीन वर्षांच्या मुलामुळे लागला हत्येचा सुगावा; म्हणाला, बाबांनी आईला खूप मारलं! तर दुसरीकडे, पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचं विसर्जन पार पडले आहे. मात्र ठिकठिकाणी गणेश विसर्जन अजूनही सुरूच आहे. पिंपर चिंचवडमध्ये इंद्रायणी नदी पात्रात सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचं विसर्जन केलं जात आहे. मोशी आळंदी रोडवर इंद्रायणी नदी पात्रात गणेश विसर्जन सुरू असताना अचानक दोन मुलं बुडाल्याची घटना घडली आहे.  दत्ता ठोंबरे (वय 20) आणि  प्रज्वल काळे (18) अशी बुडालेल्या तरुणांची नाव आहे.  प्रज्वल काळे हा ठोंबरे यांचा नातेवाईक होता. गणपती निमित्त आला होता.  घटनास्थळी अग्निशमन विभागाने धाव घेतली असून बचावकार्य सुरू आहे. एका तरुणाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे. IPL 2021 : पहिल्या मॅचआधी विराटचा मोठा निर्णय, RCB ची कॅप्टन्सीही सोडली दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील शिक्षक हमीद पठाण यांचा 17 वर्षीय मुलगा अरमान पठाण याचा बासलापूर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोहतांना गाळात पाय फसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात काका आणि इतर दोन भाऊही गाळात फसले होते. पण, वेळीच गणपती विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून  इतरांचे प्राण वाचवले.
  Published by:sachin Salve
  First published: