बदलापूरच्या बाप्पाला माॅरिशसचं आमंत्रण

आता बाप्पाला परदेशातूनही बोलावणे आलंय , बदलापूर शहरातील गणेश मूर्ती थेट समुद्रापार मॉरिशसला निघाल्या आहेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2017 12:51 PM IST

बदलापूरच्या बाप्पाला माॅरिशसचं आमंत्रण

गणेश गायकवाड, 19 जुलै : गणरायाचे आगमन अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपले आहे.एकीकडे  भाविक गणपती बाप्पाची  आतुरतेने वाट  बघत असताना आता  बाप्पाला परदेशातूनही बोलावणे आलंय , बदलापूर शहरातील गणेश मूर्ती थेट समुद्रापार मॉरिशसला  निघाल्या आहेत.

बदलापूर गणेश चित्रकला मूर्ती केंद्रात बाप्पाच्या मुर्ती घडवण्याच्या कामानं वेग घेतलाय. या गणेश कलाकेंद्रातले बाप्पाच्या 700 मूर्ती सातासमुद्रा पल्याड म्हणजे  मॉरिशसला निघालेत. विशेष म्हणजे पहिल्यादांच गौरीच्या मूर्तीही मॉरिशसला रवाना होणार आहेत.

या मूर्ती पाठवताना विशेष काळजी घेतली जाते. मूर्ती प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळून जाड खोक्यामध्ये ठेवली जाते. पॅकिंगसाठी मूर्तीच्या सभोवती 5 ते 6 किलो वजनाचे पेपर कटिंग टाकून बंद केली जाते. मग ही खोक्याचे कंटेनर न्हावा-शेवा बंदरातून समुद्रमार्गे 20 ते 22 दिवसांचा प्रवास करत मॉरिशसला पोहचतात.या गणेश कला केंद्रातल्या मूर्तींना विशेष मागणी असते. त्यामुळे  बाराही महिने इथं मूर्ती घडवण्याचं काम सुरू असतं.

या गणेश मूर्तीच्या कारखान्यात 105 प्रकारच्या ७००० मूर्ती तयार केल्या जातात. आंबवणे यांच्या मूर्तींना ठाणे,मुंबई,सातारा,नाशिक आणि पुण्यासह अनेक शहरातून मागणी असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2017 12:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...