बाप्पाच्या आशीर्वादाने आजपर्यंत मिळालं, पुढेही मिळेल -नारायण राणे

बाप्पाच्या आशीर्वादाने आजपर्यंत मिळालं, पुढेही मिळेल -नारायण राणे

"बळीराजावर कोणतीही संकट येऊ नये तो सबळ व्हावा, सुखी व्हावा असं वातावरण निर्माण करावं असं साकडं..."

  • Share this:

25 आॅगस्ट : श्री गणरायावर माझी निस्सीम भक्ती आहे म्हणून मला शक्ती मिळते. मला जे जे हवं ते गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आजपर्यंत मिळालं आहे आणि यापुढेही मिळत राहील असा आत्मविश्वासही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी व्यक्त केला.

नारायण राणे यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं. यावेळी मीडियाशी संवाद साधला. महाराष्ट्रातील जनतेला सुखी आणि समाधानी करावे. बळीराजावर कोणतीही संकट येऊ नये तो सबळ व्हावा, सुखी व्हावा असं वातावरण निर्माण करावं असं साकडं नारायण राणे यांनी गणरायाकडे घातलं.

तसंच महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा या पुढील काळातही माझ्याकडून पूर्ण होतील असंही राणे यावेळी म्हणाले. भाजपा प्रवेशाच्या प्रश्नावर थेट बोलणे टाळत माझ्या पेक्षा जास्त पत्रकारांनाच यासंदर्भात जास्त माहिती आहे असा टोलाही राणेंनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2017 02:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading