Home /News /mumbai /

धक्कादायक! मुंबईतील तुरुंगात आजही गॅंगस्टर सक्रिय! आतून हलवतात गॅंगची सूत्रे

धक्कादायक! मुंबईतील तुरुंगात आजही गॅंगस्टर सक्रिय! आतून हलवतात गॅंगची सूत्रे

आजही तुरुंगात गॅंगस्टर सक्रिय असून ते आतून गॅंग चालवत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे

मुंबई, 21 डिसेंबर: मुंबईतून गॅंगवार (Mumbai Gangwar) हद्दपार झाले असून गॅंगस्टर (Gangster) हा प्रकार नावालाही राहिलेला नाही, असा दावा मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) केला जातो. मात्र, आजही तुरुंगात गॅंगस्टर सक्रिय असून ते आतून गॅंग चालवत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. एवढंच नाही तर खटल्यातील साक्षीदारांना धमकावण्याचे प्रकार तुरुंगातून सुरू आहेत. महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकानंच ( Anti-Terrorism Squad-ATS) हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. मटका किंग सुरेश भगत याची हत्या केलेल्या दोन आरोपींनी हा प्रताप केल्याची माहिती समजते. हेही वाचा... पुण्यात जन्मदात्यानेच आपल्या 9 वर्षींच्या मुलीला बनवली वासनेची शिकार! जून 2015 मध्ये दहशतवाद विरोधी पथकानं एका टोळीचा पर्दाफाश करून एका अंमली पदार्थ निर्मिती युनिटमधून सुमारे 155 किलो कच्चा व तयार मेफेड्रॉन (MD)हा अंमली पदार्थ जप्त केला होता. या कारवाईमध्ये प्रमुख आरोपी साजिद इलेक्ट्रीकवाला याच्यासह एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली होती. मुख्य आरोपी साजिद इलेक्ट्रीकवाला हा 2005 पासूनच मुंबई मध्यवर्ती कारागृह ऑर्थर रोड येथे कैद आहे. त्यानं अनेकदा प्रयत्न करूनही त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही. या गुन्ह्या संदर्भातील खटल्याची सुनावणी ही मुंबईतील विशेष एनडीपीएस न्यायालयात सुरू असून ATSने चारकोप युनिट हे या खटल्यामध्ये तपास करत आहे. कोविड-19 या आजाराच्या पार्श्वभूमीवर याचवर्षी मार्च 2020 मध्ये या खटल्याची न्यायालयीन सुनावणी स्थगित होईपर्यंत या खटल्यातील कांदिवली येथे राहणाऱ्या एका महत्त्वाच्या साक्षीदाराची साक्ष काही प्रमाणात पूर्ण झालेली होती. खटल्याची सुनावणी पुन्हा सुरू झाल्यावर न्यायालयाने प्रथमच 26 नोव्हेंबर या दिवशी साक्ष अपूर्ण राहिलेल्या साक्षीदारस साक्षीसाठी बोलावलं होतं. त्याच्याबरोबर एक आठवडा अगोदरच त्या साक्षीदारस ओळखणारा कांदिवली येथे राहणारा आरोपी सुजित पडवळकर यानं त्याला आरोपी साजिद इलेक्ट्रीकवाला यास मदत व्हावी, यासाठी न्यायालयीन सुनावणीत खोटी साक्ष दयावी म्हणून धमकावले. आरोपी सुजित हा साक्षीदाराच्या परिचयाचा असल्याने साक्षीदार यांनी प्रथम त्याकडे दुर्लक्ष केलं. परंतु त्याच धमकावणे सलग चार-पाच दिवस सुरूच राहिल्यानं साक्षीदारानं ATSच्या चारकोप युनिटकडे धाव घेवून घडलेला प्रकार सांगितला. साक्षीदारासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच ATS ने तात्काळ साक्षीदाराच्या तक्रारीवरुन आरोपी सुजित पडवळकर व इतर यांच्याविरूध्द साक्षीदारास धमकावणे या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल केला. सापळा रचून पुन्हा साक्षीदारास धमकावण्यासाठी आलेल्या आरोपी सुजित पडवळकर यास रंगेहात पकडून दाखल गुन्ह्यात अटक केली. आरोपी सुजित पडवळकर याने गँगस्टर हरीष मांडवीकर याचा हस्तक सचिन कोळेकर उर्फ पिंटू याच्या सांगण्यावरून साक्षीदारास धमकावल्याचे चौकशीत कबूल केलं आहे. त्यानुसार पुढील तपासात आरोपी सचिन कोळेकर याच्या सहभागाबाबत पुरावे प्राप्त करून त्यालाही अटक केली. आरोपी सचिन कोळेकर याने गँगस्टर हरिष रामा मांडवीकर उर्फ गणिगा याच्या सांगण्यावरून केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. गँगस्टर हरीष मांडवीकर यांच्याविरुध्द खुनाच्या दोन गुन्ह्यांसह एकूण 13 गुन्हे दाखल असून त्यातील एका गुन्ह्यात म्हणजे मटका किंग सुरेश भगतच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा लागलेली आहे. गॅंगस्टर हरीश हा मोक्का गुन्ह्यांतर्गत ऑर्थर राड कारागृहात कैद असून कारागृहाच्या आतूनच त्याने त्याचा हस्तक सचिन कोळेकर उर्फ पिंटूच्या नावाने हस्तलिखित चिठ्ठी पाठवून आरोपी सुजित पडवळकर याचेशी बोलणी करून साक्षीदाराला धमकावण्यास सांगितले होते. हे देखील तपासात निष्पन्न झालं आहे. तर गॅगस्टर हरीष मांडवीकर व आरोपी साजिद इलेक्ट्रीकवाला हे दोघेही ऑर्थर रोड तुरुंगात कैद असून त्यांनी साक्षीदाराला धमकाविण्याबाबत कट रचला. गॅंगस्टर हरीष मांडवीकर हा मुंबई क्राईम ब्रांचने अटक केलेल्या एका गुन्ह्यांत मार्च 2020 पासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानं कारागृहाबाहेर हस्तलिखित चिठ्ठ्या पाठविण्यास सुरूवात केली. या चिठ्ठ्या तो त्याची पत्नी हेमलता मांडवीकर आणि पंटरामार्फत पाठवत होता. त्या चिठ्ठ्यांमधील मजकूरानुसार त्याची पत्नी त्यास दैनंदिन गरजेच्या वस्तू कारागृहात पाठवत होती. तसेच आरोपी सचिन कोळेकर उर्फ पिंटू आणि त्याचे इतर पंटर हे गँगस्टर हरीष मांडवीकर याची इतर कामे करत होते. गँगस्टर हरीष मांडवीकर हा कारागृहातून त्यानं लिहिलेल्या चिठ्ठ्या कारागृहाबाहेर नेमक्या कशा पाठवत होता याबाबत ATS तपास करत आहेत. हेही वाचा...मुंबईकरांनो...NEW YEAR चा प्लॅन करत असाल तर थांबा! असे आहेत नवे नियम तुरुंगातून गॅंग चालवणाऱ्या कुख्यात गॅंगस्टर्सना ATSने अटक केली. खरं पण पुन्हा एकदा हे सिद्ध झालं आहे की मुंबईत आजही गॅंग सक्रिय आहेत. जेव्हा पोलिसांचा वचक, पोलिसांची दहशत नव्हती. त्या 80-90 च्या दशकात गॅंग चालवल्या जायच्या तशाच पद्धतीने गॅंग गॅंगस्टर पुन्हा चालवत आहेत, अशा संशय व्यक्त केला जात आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: ATS, Maharashtra, Mumbai, Mumbai police

पुढील बातम्या