Home /News /mumbai /

लॉकडाउनमध्ये 'डॅडी'च्या दगडी चाळमध्ये लग्नसोहळा, मुलगी अडकणार 'या' अभिनेत्यासोबत लग्नबेडीत

लॉकडाउनमध्ये 'डॅडी'च्या दगडी चाळमध्ये लग्नसोहळा, मुलगी अडकणार 'या' अभिनेत्यासोबत लग्नबेडीत

मुंबईतल्या दगडी चाळीतच हा विवाहसोहळा पार पडणार असून या लग्नाला अरुण गवळीसुद्धा उपस्थित राहणार आहे.

    मुंबई, 07 मे :  कुख्यात गँगस्टर आणि माजी आमदार अरुण गवळीच्या घरी लॉकडाउनमध्ये लग्न सोहळा पार पडणार आहे. अरुण गवळीची मुलगी योगिता आणि अभिनेता अक्षय वाघमारे उद्या ८ मे रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. अरुण गवळीच्या मुलगी योगिता आणि अक्षय वाघमारे यांचा 29 मार्च रोजी या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार होता. मात्र, लॉकडाउनमुळे हा विवाह सोहळा रद्द करावा लागला होता. परंतु, आता लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात काही अटी शिथील करण्यात आल्या आहे. त्यामुळे गवळी कुटुंबाकडून लग्न सोहळा उरकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, हा विवाह सोहळा उद्या पार पडणार आहे. या लग्न सोहळ्यासाठी मुंबई आणि पुणे पोलिसांची विशेष परवानगी घेण्यात आली आहे. मुंबईतल्या दगडी चाळीतच हा विवाहसोहळा पार पडणार आहे. गुरुवारी हळदीचा कार्यक्रम पार पडणार असून शुक्रवारी संध्याकाळी लग्न होणार आहे. या लग्नाला अरुण गवळीसुद्धा उपस्थित राहणार आहे. हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये सारानं बाबांसाठी बनवले खास कबाब, 60 सेकंदात सचिननं काय केलं पाहा या लग्नसोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळले जातील, असंही अक्षयनं सांगितलं. एवढंच नाहीतर वऱ्हाडी मंडळींना सॅनिटायझर आणि फेस मास्क दिले जाणार आहे. हा लग्नसोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्यानंतर मुंबईत परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर  धूमधडाक्यात रिसेप्शनचं आयोजन केलं जाईल, अशीही माहिती अक्षयने दिली.
    अक्षय आणि योगिता एकमेकांना गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. त्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांना विवाहबंधनात अडकण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, डिसेंबर 2019 मध्ये योगिता आणि अक्षयचा साखरपुडा झाला होता. हा साखरपुडा समारंभ जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवारासह एका हॉटेलमध्ये पार पडला होता.  अक्षयने ‘फत्तेशिकस्त’, ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’ आणि ‘बस स्टॉप’ या मराठी चित्रपटांत काम केले आहे. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या