मुंबई, 22 जानेवारी : मुंबईतील शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या (Shivaji Nagar Police Station in Mumbai) हद्दीत एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार (gang rape) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर 2 जण फरार झाले आहे. धक्कादायक म्हणजे, अटक करण्यात आलेले दोन जण हे अल्पवयीन आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी पीडित तरुणीचा जबाब नोंदवला आहे. तिने दिलेल्या फिर्यादीवरून 4 जणांविरोधात आयपीसी कलम 376,376(D) आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पीडित आणि आरोपी हे एकमेकांना ओळखत होते. पीडित तरुणी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास केटरिंगचे काम करून घरी येत होती. त्याच वेळी चारही आरोपी शिवाजीनगर जुन्या बस डेपोसमोर बसलेले होते. आरोपींनी पीडितेला हटकले. 'इतक्या उशीरा कुठून येत आहे', अशी विचारणा आरोपींनी केली. त्यानंतर त्यातील 'एका आरोपीने मला तुझ्यासोबत काही तरी बोलायचे आहे', असं सांगून तिला घेऊन जवळच असलेल्या एका झोपडपट्टीत घेऊन गेला. त्यावेळी इतर तिन्ही आरोपी तिथे पोहोचले आणि त्यांनी जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. पीडितेनं मदतीसाठी आवाज दिला आणि आरडाओरडा केला. पण चारही आरोपींनी तिच्या तोंडावर हात ठेवला. त्यानंतर एकएक करून चारही आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर घटनास्थळावरून चारही आरोपी पळून गेले.
(दीड लाखांपर्यंत अतिरिक्त टॅक्स सूट मिळू शकते, करावं लागेल 'हे' काम)
घटनेनंतर पीडित तरुणी जवळील असलेल्या शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तक्रार दाखल केली. पीडितेची हकीकत ऐकून पोलिसांनी तातडीने पाऊल उचलली आणि गुन्हा दाखल केला. त्यानंतर १० जणांची टीम तयार केली आणि आरोपींचा शोध सुरू केला.
('सुंदरा मनामध्ये भरली' मधील अभ्याच्या लेकीचा क्यूटवाला फोटो पाहिला का?)
पोलिसांनी वाशी नाका, मुंब्रा, बेलापूर, CSMT रेल्वे स्टेशन, LTT रेल्वे स्टेशन, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन इतर ठिकाणी बंदोबस्त तैनात केला. पीडितेनं वर्णन केलेल्या चारही आरोपींचा शोध सुरू केला. 2 आरोपी उत्तरप्रदेशमधील बस्ती जिल्ह्यात पळून जाणार अशी माहिती मिळाली होती. पोलिसांनी धडक कारवाई करत दोन्ही अल्पवयीन मुलांना डोंगरी परिसरातून अटक केली. तर इतर दोन आरोपी फरार झाले आहे. या फरार आरोपींचा शोध घेत आहे. मुंबई पोलिसांची एक टीम उत्तर प्रदेशसाठी रवाना झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.