बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार; अल्पवयीन मुलासह आरोपी गजाआड

बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार; अल्पवयीन मुलासह आरोपी गजाआड

धक्कादायक म्हणजे आई-वडिलांना हे कळेल यामुळे पीडित मुलगी 2 दिवस बेपत्ता होती.

  • Share this:

01 मार्च : बदलापूरात एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिच्या ओळखीच्या असलेल्या, रविंद्र सांजेकर, अहमद खान आणि एका अल्पवयीन मुलाने तिला फिरायला घेऊन जातो असं सांगून मोटर सायकलवर बसवलं. आणि त्यानंतर शिरगाव-पनवेल हायवेलगत असलेल्या डोंगराळ भागात नेऊन आळीपाळीनं तिच्यावर बलात्कार केला.

पोलिसांनी या आरोपींना अटक केली असून त्यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे. धक्कादायक म्हणजे आई-वडिलांना हे कळेल यामुळे पीडित मुलगी 2 दिवस बेपत्ता होती. त्यामुळे पोलिसांनी आधी तिला शोधून काढलं. आणि नंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.

सगळा प्रकार घडल्यानंतर या मुलीच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published: March 1, 2018, 8:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading