गणेश मंडळांची हरकत नसल्यास डीजे लावा - राज ठाकरे

गणेश मंडळांची हरकत नसल्यास डीजे लावा - राज ठाकरे

  • Share this:

मुंबई, 18 सप्टेंबर: राज्यात गणेशोत्सव काळात डीजे साउंड सिस्टीम लावण्यास मनाई केली. या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची डीजे व्यावसायिक यांनी भेट घेतली. डीजेला बंदी असल्यामुळे व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसत असल्याचा सूर या व्यावसायिकांनी लावला. यासंदर्भात त्यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि यावर तोडगा काढण्यासाठीची मागणीही केली.

या भेटीनंतर यावेळेस गणपती मंडळांची हरकत नसल्यास डीजे साउंड सिस्टीम लावावी अस मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं असल्याचं व्यावसायिकांनी सांगितलं. त्यामुळे आता डीजे वाजणार की नाही यावर मोठा प्रश्न आहे. यामागेही गणेश मंडळांच्या मंडपाबाबतचा प्रश्न राज ठाकरे यांनी सोडवला होता. त्यामुळे आताही ते अशीच मदत करतील अशी आशा व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्रातून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलंय. 68 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या मोदींना स्वतःच्याच प्रेमात पडलेला प्रसिद्धी विनायक अशा शब्दांत टोला लगावलाय. यासाठी त्यांनी राज्य सरकारनं नुकत्याच काढलेल्या आदेशाचा दाखला दिलाय. यामध्ये सर्व शाळांना मोदींच्या आयुष्यावर आधारित चलो जीते है हा लघुपट दाखवण्याची सक्ती करण्यात आलीय.

ना उम्र की सीमा हो... अनुप जलोटाप्रमाणे 'या' सेलिब्रिटींनी तोडली वयाची बंधनं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2018 07:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading