03 एप्रिल : राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक भाजपात आले तर मी त्यांचा स्वागतच करीन.. मी त्यांची आरती घेऊन स्वागत करेन असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी करुन एकच खळबळ उडवून दिली.
राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील मातब्बर नेते गणेश नाईक यांच्या भाजपप्रवेशाची पुन्हा चर्चा सुरू झालीये. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी त्यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चेला तोंड फोडलंय.
गणेश नाईक भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागतच करेन, त्यांची आरती ओवाळीन असं मंदा म्हात्रे यांनी म्हटलंय. यापूर्वी ही राष्ट्रवादीत ही मीच त्यांना घेवून गेली होती. माञ, प्रवेशानंतर माझ्यावरच दगाफटका केला होता. तरीही मी त्यांच्या प्रवेशासाठी तयार आहे. असं मंदा म्हाञे यांनी म्हटलंय.
गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादीत महत्त्व कमी झाल्याची भावना गणेश नाईकांच्या समर्थकांमध्ये आहे. त्यामुळे गणेश नाईक खरंच भाजपच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा आता सुरू झालीये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.