प्रमोद पाटील, नवी मुंबई
नवी मुंबई, 6 डिसेंबर : नवी मुंबईचे भाजप नेते गणेश नाईक यांचे लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण पुन्हा समोर आल्याने नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मागील पाच दिवसापूर्वी कोणत्याही पुराव्याअभावी मुंबई उच्च न्यायालयाने संपूर्ण प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले होते. असे असताना पुन्हा संबधित महिला समोर आली असून गणेश नाईक यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत.
मला माझ्या व्यवसायातून मिळणारे इन्कम बंद केले असून मी कशावर जगायचे? काय खायचे? माझ्या मुलाला नाव द्यायला गणेश नाईक का घाबरत आहेत? ते आम्हाला का स्वीकारत नाहीत? आमच्यापासून लांब पळून जात आहेत, अशी अनेक प्रश्नांची सरबत्ती यावेळी महिलेने केली. नवी मुंबईत पुन्हा एकदा गणेश नाईक प्रकरण चव्हाट्यावर आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. कोर्टाने प्रकरण निकाली काढल्यानंतरही कोर्टात जाऊन न्याय न मागता पत्रकार परिषद घेऊन गणेश नाईक यांना बदनाम करण्याचे काम करत आहेत का? यासाठी आपल्याला आपल्याच आणि काही विरोधी पक्षातील नेते पाठबळ देत आहेत का ? असा प्रश्न महिलेला केला असता त्यांनी मी कुणाला बदनाम करत नाहीत. माझ्या मुलाचा स्वीकार करावा इतकीच अपेक्षा आहे. मात्र, पुन्हा निघालेल्या या प्रकरणाने नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गणेश नाईक यांनी मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याने त्यांच्या प्रतिमेला पुन्हा एकदा धक्का देण्याचा प्रकार काही आपलेच तर काही विरोधी नेते करत तर नाही ना? अशी चर्चा रंगली आहे.
वाचा - लग्नाच्या सहा महिन्यातच तरुणी बॉयफ्रेंडसोबत फरार; म्हणाली, पुस्तक देऊन येते अन्...
मुंबई उच्च न्यायालयातून गणेश नाईक यांना दिलास
नवी मुंबईचे भाजप नेते गणेश नाईक यांना मुंबई उच्च न्यायालयातून मोठा दिलासा मिळाला. नाईक यांच्या विरोधातला नवी मुंबईतील दोन गुन्हे प्रकरणं तीन महिन्यांत निकाली काढण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित दंडाधिकारी न्यायालयाला निर्देश दिली होते. आता त्यांची याचिका निकाली काढली आहे. गणेश नाईक यांच्या विरोधात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं बलात्काराचे आरोप केले होते. त्यात पुरावे उपलब्ध नसल्याचं सांगत नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी ‘ए समरी’ रिपोर्ट कोर्टात सादर केली आहे. त्याचबरोबर नाईक यांच्या विरोधात राजकीय वैमनश्यातून तक्रार दाखल झाल्याचा गणेश नाईक यांच्या वतीने दावा करण्यात आला. हा दावा मुंबई उच्च न्यायालयानं ग्राह्य धरला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Ganesh naik