लोकलमध्ये स्टंटबाजी करतांना कळवा खाडीत पडलेल्या गणेशचा मृत्यदेह 7 दिवसांनंतर सापडला

कळवा खाडीत तोल जाऊन गणेश इंगोले हा १७ वर्षांचा तरुण पडला होता. त्याचा मृतदेह कशेळी खाडी पुलाजवळ तब्बल सात दिवसांनंतर सापडला.

कळवा खाडीत तोल जाऊन गणेश इंगोले हा १७ वर्षांचा तरुण पडला होता. त्याचा मृतदेह कशेळी खाडी पुलाजवळ तब्बल सात दिवसांनंतर सापडला.

  • Share this:
19 जून : धावत्या लोकलमधून रेल्वे रुळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची टोपी उडवण्यासाठी वाकल्याने कळवा खाडीत तोल जाऊन गणेश इंगोले हा १७ वर्षांचा तरुण पडला होता. त्याचा मृतदेह कशेळी खाडी पुलाजवळ तब्बल सात दिवसांनंतर सापडला. विक्रोळीतील सूर्यनगर भागात गणेश इंगोले राहत होता. ११ जूनला घरी न परतल्यानं त्याच्या कुटुंबीयांनी पार्कसाईट पोलीस ठाण्यात गणेश बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. विक्रोळी स्टेशनवरच्या सीसीटीव्हीमध्ये गणेश त्याच्या मित्रासोबत जाताना दिसला. मात्र कळवा स्टेशनच्या सीसीटीव्हीमध्ये गणेश त्याच्या मित्रासोबत लोकलमधून उतरताना दिसला नाही. त्यामुळे पोलिसांनी गणेशच्या मित्रांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. त्यावेळी पाचव्या दिवशी त्याच्याच मित्रांनी गणेश कळवा खाडीत पडल्याची कबुली दिली. गणेश उत्तम डान्सर असल्याने त्याला वेगवेगळे स्टंट करण्याची सवय होती. लोकलच्या प्रवासातही त्याने स्टंट करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कळवा रेल्वे खाडी पुलावरही गणेशने येथे काम करणाऱ्या गँगमनची टोपी उडवण्याचा प्रयत्न केला असता त्याचा खांदा रेल्वे खांबाला आदळला. आणि तोल जाऊन गणेश थेट खाडीत पडला.
First published: