Home /News /mumbai /

Ganesh Chaturthi 2021 Messages: गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेज, Facebook, WhatsApp Status

Ganesh Chaturthi 2021 Messages: गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेज, Facebook, WhatsApp Status

Ganesh Chaturthi 2021 Messages: गणेश चतुर्थीनिमित्त शुभेच्छा देणारे खास मराठमोळे मेसेजेस आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

  मुंबई, 8 सप्टेंबर : Ganesh Chaturthi 2021 Facebook WhatsApp Marathi Messages: भारतात प्रत्येक सणाला एक वेगळे आणि खूपच खास महत्त्व असते. त्यापैकीच एक म्हणजे गणेशोत्सव (Ganeshotsav) आहे. गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या धुमधडाक्यात, उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येतो. यंदा 10 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी आहे तर 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. घरगुती गौरी-गणपती (Gauri Ganpati) सोबतच मंडळांमध्येही गणपती बाप्पा विराजमान होतात. गणेशोत्सवात शुभेच्छा देणारे काही मेसेजेस Ganeshotsav Ganesh Chaturthi Messages, Ganesh Chaturthi HD Images, Happy Ganesh Chaturthi Messages सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियात व्हायरल होणारे हेच मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पाहूयात गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे काही खास मराठी मेसेजेस. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस (Ganesh Chaturthi 2021 Messages)

  गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास

  घरात आहे लंबोदराचा निवास

  दहा दिवस आहे आनंदाची रास

  || गणपती बाप्पा मोरया ||

  || गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा ||

  वंदन करतो गणरायाला,

  हात जोडतो वरद विनायकाला

  प्रार्थना करतो गजाननाला

  सुखी ठेव नेहमी...

  सर्व गणेश भक्तांना

  श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

  हार फुलांचा घेऊनी |

  वाहु चला हो गणपतीला ||

  आद्य दैवत साऱ्या जगाचे |

  पुजन करुया गणरायाचे ||

  श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा !

  फुलांची सुरुवात कळीपासून होते

  जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते

  प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते

  आणि आपल्या कामाची सुरुवात

  श्री गणेशा पासून होते

  || गणपती बाप्पा मोरया ||

  || गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा ||

  तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत,

  सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती,

  आरोग्य आपणांस लाभो;

  हीच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना

  श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा

  || श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा ||

  गणपती बाप्पा मोरया

  आजपासून सुरू होणाऱ्या

  गणेशोत्सवाच्या तुम्हाला आणि

  तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा

  || गणपती बाप्पा मोरया ||

  वक्रतुंड महाकाय

  सुर्यकोटी समप्रभ: |

  निर्विघ्नं कुरू मे देव

  सर्वकार्येषु सर्वदा ||

  गणपती बाप्पा मोरया,

  मंगलमूर्ती मोरया !

  सर्व गणेशभक्तांना

  श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

  तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता

  अवघ्या दिनांचा नाथा

  बाप्पा मोरया रे,

  बाप्पा मोरया रे

  चरणी ठेवितो माथा

  || गणपती बाप्पा मोरया ||

  || गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा ||

  Published by:Sunil Desale
  First published:

  Tags: Culture and tradition, Ganesh chaturthi

  पुढील बातम्या