• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • गणेशोत्सव 2021 : यंदाचं सेलिब्रेशनही ‘शांततेत’, केवळ 16 टक्के मंडळांना मंडप उभारायला परवानगी

गणेशोत्सव 2021 : यंदाचं सेलिब्रेशनही ‘शांततेत’, केवळ 16 टक्के मंडळांना मंडप उभारायला परवानगी

मुंबईत यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सवही (Ganesh Festival 2021) कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर शांततेत (Silent) आणि साधेपणानं साजरा होणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 27 ऑगस्ट :  यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सवही (Ganesh Festival 2021) कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर शांततेत (Silent) आणि साधेपणानं साजरा होणार आहे. मुंबई महापालिकेनं (BMC) केवळ 16 टक्के गणेश मंडळांना (16% Ganesh Mandals) सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारण्याची परवानगी दिली आहे. एकूण 1273 मंडळांनी मंडप उभे करण्यासाठी परवानगी (Permission) मागितली होती. त्यापैकी केवळ 519 मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. कोरोनापूर्व काळात अशी परवानगी मागणाऱ्या मंडळांची संख्या 3000 पेक्षाही अधिक असायची. उत्सवावर कोरोनाचे सावट सलग दुसऱ्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. गणेश मूर्तींची मागणी यंदादेखील कमी असून लोकांमध्ये खरेदीसाठीचा उत्साहदेखील कमी असल्याचं चित्र आहे. मूर्तीकारांकडे यंदा मूर्ती बनवण्याची काम फारच कमी प्रमाणात आली असून मंडपच उभे करण्यावर मर्यादा असल्याचा हा परिणाम असल्याचं प्रसिद्ध मूर्ती मूर्तीकार विनय जिलका यांनी म्हटलं आहे. गणेशोत्सवाबाबत अनिश्चिततेचं वातावरण असल्यामुळे मूर्तीची ऑर्डर द्यावी की नाही, या संभ्रमात मंडळं आहेत. आयत्या वेळी पालिकेची परवानगी मिळेल का, प्रत्यक्ष गणेशोत्सवावेळी शहरात कोरोनाची काय स्थिती असेल, असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांना पडले असल्यामुळे मूर्तीसाठी ते ऑर्डरच नोंदवत नसल्याचं जिलका सांगतात. कोरोनापूर्व काळात मूर्तीकारांना श्वास घ्यायलादेखील याचं वेळ नसायचा. गेल्या दोन वर्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे. काही स्वयंसेवी संस्थांनी कोरोनाबाबतचे निकष पाळून गणेशोत्सव कसा साजरा येईल, याच्या उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. त्यासाठी घरोघरी इको फ्रेंडली गणेश मूर्ती पोहोचवणे आणि त्या मूर्तींचं विसर्जनही घरातच कसं करता येईल, याची माहिती देण्याचं काम काही स्वयंसेवी संस्था करत आहेत. मूर्तींची होम-डिलिव्हरी आणि घरातच विसर्जन करण्याच्या प्रकारामुळे नागरिकांना बाहेर पडावं लागणार नाही आणि गर्दी टळेल, यासाठी काही संस्था कार्यरत आहेत. हे वाचा - केजरीवालांच्या भेटीनंतर सोनू सूद दिल्ली सरकारच्या विशेष कार्यक्रमाचा अ‍ॅम्बेसेडर गणेशोत्सवासाठी महत्त्वाचे निर्बंध लालबागचा राजा, गणेश गल्ली यासारख्या मोठ्या आणि इतर सर्व छोट्या मंडळांसाठी मुंबई महापालिकेनं कडक निर्बंध पाळूनच गणेशोत्सव साजरा करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये मूर्तीची उंची जास्तीत जास्त 4 फूट आणि घरगुती गणेशोत्सवासाठी जास्तीत जास्त 2 फूट असावी, असं म्हटलं आहे. मंडळांनी मूर्तींचं ऑनलाईन दर्शन उपलब्ध करून द्यावं आणि गर्दी टाळावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. एका वेळी मंडपात जास्तीत जास्त 5 कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याची परवानगी असणार आहे. मुंबई महापालिकेच्या या निर्णयावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. पश्चिम बंगालमध्ये दूर्गापूजेदरम्यान जो गोंधळ झाला, तसाच गोंधळ मुंबईत सुरु असल्याची टीका भाजप आमदार नितेश राणेंनी केली आहे.  मंडळांमध्ये नियमांबाबत प्रचंड गोंधळ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर निर्बंध गरजेचे असले तरी उत्सव साजरे करूच नका, अशी भूमिका घेणं चुकीचं असल्याची टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.
  Published by:desk news
  First published: