Home /News /mumbai /

Gauri Ganpati Invitation Marathi Messages: गौरी - गणपती दर्शनाचे आमंत्रण, Facebook, WhatsApp मेसेज

Gauri Ganpati Invitation Marathi Messages: गौरी - गणपती दर्शनाचे आमंत्रण, Facebook, WhatsApp मेसेज

Gauri Ganpati Invitation Messages: गौरी गणपती दर्शनाचे आमंत्रण देणारे मराठमोळे मेसेजेस आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

  मुंबई, 8 सप्टेंबर: Gauri Ganpati Invitation 2021 Facebook WhatsApp Marathi Messages: भारतात प्रत्येक गणेशोत्सवाला (Ganeshotsav) खूपच खूपच खास महत्त्व आहे. सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, आनंदात दरवर्षी साजरा करण्यात येत असतो. यंदा 10 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) आहे तर 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) आहे. घरगुती गौरी-गणपती सोबतच मंडळांमध्येही गणपती बाप्पा विराजमान होतात. आपल्या घरी नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना गौरी-गणपतीच्या (Gauri Ganpati) दर्शनाचे आमंत्रण देण्यासाठी तुम्ही मेसेज पाठवू शकता. असेच आमंत्रण देणारे मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे मेसेज तुम्ही पाठवून गौरी-गणपतीच्या दर्शनासाठी आमंत्रण देऊ शकतात. गौरी गणपती दर्शनाचे आमंत्रण देणारे मेसेजेस (Gauri Ganpati Invitation 2021 Messages)

  || श्री गणेशाय नम: ||

  आग्रहाचे आमंत्रण

  आमच्या येथे गणपती बाप्पा

  दहा दिवसांसाठी विराजमान झाले आहेत.

  तरी आपण सर्वांनी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती.

  गणपती बाप्पा मोरया

  || श्री गणेशाय नम: ||

  आग्रहाचं आमंत्रण

  आपणास कळविण्यास आनंद होत आहे की,

  दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या घरी

  श्री गणेशाचे 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर रोजी आगमन होणार आहे

  तरी आपण सर्वांनी सहकुटुंब दर्शनाला यावे

  || श्री गणेशाय नम: ||

  आपणांस आग्रहपूर्वक

  आमंत्रण देत आहे की,

  आपण सहकुटुंब, सहपरिवार

  बाप्पाच्या दर्शनास यावं.

  आपली उपस्थिती आम्हासाठी अनमोल आहे

  || गणपती बाप्पा मोरया ||

  || श्री गणेशाय नम: ||

  दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्याकडे

  10 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर 2021

  या पाच दिवसांसाठी बाप्पाचे आगमन होणार आहे

  तरी आपण सर्वांनी सहकुटुंब - सहपरिवार

  गौरी-गणपतीच्या दर्शनासाठी यावे

  असे आग्रहाचे आमंत्रण

  || गणपती बाप्पा मोरया ||

  आग्रहाचे आमंत्रण

  आमच्या येथे सालाबादप्रमाणे यंदाही

  गौरी - गणपतीचे आगमन होणार आहे

  तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार

  येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा

  || गणपती बाप्पा मोरया ||

  || श्री गणेशाय नम: ||

  आग्रहाचं आमंत्रण

  सालाबादप्रमाणे याही वर्षी आमच्या घरी

  दिनांक 10 सप्टेंबर 2021 रोजी

  आपल्या लाडक्या गणरायाचे

  आगमन होणार आहे.

  तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार

  येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा.

  Published by:Sunil Desale
  First published:

  Tags: Culture and tradition, Ganesh chaturthi

  पुढील बातम्या