पत्नीच्या रोजच्या कटकटीला कंटाळला होता पती, आधी पत्नीला संपवलं नंतर केली आत्महत्या

पत्नीच्या रोजच्या कटकटीला कंटाळला होता पती, आधी पत्नीला संपवलं नंतर केली आत्महत्या

आनंद माखीजा यांचे चेंबूर परिसरात फर्निचरचे शो-रूम असून त्यांना एक मुलगी आहे.

  • Share this:

मुंबई,11 ऑक्टोबर: पत्नीच्या रोजच्या कटकटीला कंटाळून एक 65 वर्षीय व्यावसायिकाने पत्नीची निर्घृण हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आनंद माखीजा असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली तर कविता माखीजा असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. दक्षिण मुंबईतील चिरा बाजार परिसरात ही घटना घडली आहे. लोकमान्य टिळक मार्ग पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.

माखीजा यांचे फर्निचरचे शो-रूम..

मिळालेली माहिती अशी की, आनंद माखीजा यांचे चेंबूर परिसरात फर्निचरचे शो-रूम असून त्यांना एक मुलगी आहे. पत्नी कविताला दम्याचा त्रास होता. तिच्या आजारपणावरून माखीजा दाम्पत्यात सतत भांडणे होत होती. या भांडणाला कंटाळून गुरुवारी मुलगी घराबाहेर गेली असता आनंद यांनी राहत्या घरात पत्नीच्या छातीत पोटात चाकूने वार केले. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असताना आनंद यांनी राहत्या बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली.

बिल्डिंगमधल्या इतर रहिवशांनी तातडीन माखीजा यांच्या मुलीला फोन करून घटनेची माहिती दिली. आनंद माखीजा आणि कविता माखीजा यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये नेले असता डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त राजीव जैन यांनी दिली आहे.

VIRAL VIDEO:धडधडत येणाऱ्या ट्रेनखाली आपणहून सरपटत गेला साप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2019 08:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading