मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राम मंदिराचा निधी डान्सबार आणि बियरबारमध्ये उडवला जातोय का? काँग्रेस नेत्याचा घणाघात

राम मंदिराचा निधी डान्सबार आणि बियरबारमध्ये उडवला जातोय का? काँग्रेस नेत्याचा घणाघात

funds of Ram Mandir - काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधील आणखी एका नेत्यानेही खळबळजनक आरोप केला होता.

funds of Ram Mandir - काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधील आणखी एका नेत्यानेही खळबळजनक आरोप केला होता.

funds of Ram Mandir - काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधील आणखी एका नेत्यानेही खळबळजनक आरोप केला होता.

  • Published by:  Meenal Gangurde

Congress leader Nana Patole's aggressive comment on ram mandir funds : मुंबई, 4 मार्च : राम मंदिर (Ram mandir) उभारणीसाठी जनतेकडून निधीचं संकलन करण्यात आलं आहे. यामध्ये अगदी गरीबांपासून ते श्रीमंतापर्यंत अनेकांनी दान दिलं आहे. दरम्यान काँग्रेसकडून या निधी संकलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. राम मंदिरासाठी जमा केल्या जाणाऱ्या निधीबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. याबाबत ते म्हणाले की, राम मंदिरासाठी जमा केलेला निधी कोणी डान्सबार किंवा बियरबारमध्ये उडवत असेल तर त्याचा हिशोब मागितलाच पाहिजे. मी 30 वर्षांपूर्वी राम मंदिराला निधी दिला त्याच काय झालं? हे विचारण्याचा मला अधिकार आहे, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या एका नेत्यानेही राम मंदिराच्या नावावर जमा केलेल्या निधीचा उपयोग दारू पिण्यासाठी केल्याचा धक्कादायक आरोप केला होता. याचा एक व्हिडिओदेखील समोर आला होता. (funds of Ram Mandir being blow in dance bars or beer bars Congress leader Nana Patole's aggressive comment)

हे ही वाचा-दिदी बंगाली वाघिण...', बंगाल निवडणूक लढवण्याबाबत संजय राऊतांनी केली ही घोषणा

काय आहे आरोप?

कांतीलाल भूरिया हे मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते आहेत. ते युपीए 2 (UPA 2) सरकारच्या राजवटीमध्ये केंद्रीय मंत्री होते.  तसंच ते झाबुआमधून पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना भूरिया म्हणाले की " भाजपा नेते राम मंदिराच्या नावाखाली लोकांकडून निधी गोळा करतात आणि रात्री याच पैशांंमधून दारु पितात.'' त्यांच्या या आरोपाची व्हिडीओ क्लिप (Video Clip) सोशल मीडियावर व्हायरल (Viral ) झाली आहे.

First published:

Tags: Ayodhya, Ayodhya ram mandir, BJP, Congress, Mumbai, Nana Patole, PM narendra modi