मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

VIDEO: तांत्रिक बिघाडानंतर एअर अ‍ॅम्बुलन्सचं मुंबई विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग, मोठी दुर्घटना टळली

VIDEO: तांत्रिक बिघाडानंतर एअर अ‍ॅम्बुलन्सचं मुंबई विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग, मोठी दुर्घटना टळली

मुंबई विमानतळावर एका खासगी विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे.

मुंबई विमानतळावर एका खासगी विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे.

मुंबई विमानतळावर एका खासगी विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे.

  • Published by:  Sunil Desale
मुंबई, 6 मे: मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक हाय अलर्ट घोषित करण्यात होता. नागपूर-हैदराबाद (Nagpur- Hyderabad) या एअर अ‍ॅम्बुलन्समध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर हा हाय अलर्ट जाहीर करण्यात आला होता. या विमानाच्या एमर्जन्सी लँडिंगची तयारी करण्यासाठी अलर्ट जाहीर करण्यात आला होता. बराच वेळ आकाशात गिरट्या घातल्यानंतर विमानाचं सुरक्षितपणे लँडिग करण्यात आलं आहे आणि विमानातील सर्वजण सुखरूप आहेत. नागपूर-हैदराबाद या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. तांत्रिक बिघाडानंतर विमान मुंबई विमानतळाच्या दिशेने वळवण्यात आलं. तांत्रिक बिघाड झालेलं हे एक प्रायव्हेट जेट होतं. विमानाचं शेड्युल्ड नसल्याने त्याला काही काळ विमानतळ परिसरात आकाशातच घिरट्या घालाव्या लागल्या. त्यानंतर विमानतळावर अलर्ट जाहीर करण्यात आला आणि मग विमानाचं मुंबई विमानतळावर लँडिंग करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून हैदराबादला जाणाऱ्या एअर अ‍ॅम्बुलन्सचं लँडिंग गिअर खाली पडल्यानंतर विमानाला मुंबई विमानतळावर लँडिंगसाठी वळवण्यात आले. या विमानाने नागपूरहून ज्यावेळी उड्डाण केले होते त्यावेळी विमानाचं एक चाक खाली पडलं होतं. मात्र, असे असले तरी सुदैवाने या एअर अ‍ॅम्बुलन्सचं सुरक्षितपणे लँडिग करण्यात आलं आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, जेटसर्व एविएशन C-90 एअर  अ‍ॅम्बुलन्स नागपूर ते मुंबई या मार्गावर उड्डाण करते. नागपूर विमानतळावरील रनवे 32 वरुन उड्डाण घेत असताना विमानाचं चाक विमानापासून वेगळं झालं आणि खाली कोसळलं होतं असं सिविल एविएशन विभागाचे डीजी अरुण कुमार यांनी सांगितलं. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, विमानाचे वैमानिक केशरी सिंह यांनी सांगितले की विमानाचं चाक पडल्याची जाणीव त्यांना झाली. विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यापूर्वी आकाशात बराचवेळ घिरट्या घालाव्या लागल्या आणि त्यात बरंच इंधन वाया गेलं. त्यानंतर मी लँडिंग केलं.
First published:

Tags: Mumbai

पुढील बातम्या