S M L

आज मध्यरात्रीपासून बेस्ट संघटनांचा संपाचा इशारा, मात्र कामगार सेनेची माघार

विविध बेस्ट कर्मचारी संघटनांनी आज मध्यरात्रीपासून संपाचा इशारा दिलाय. या संपकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी आज दुपारी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ चर्चा करणार.

Sonali Deshpande | Updated On: Feb 14, 2018 11:28 AM IST

आज मध्यरात्रीपासून बेस्ट संघटनांचा संपाचा इशारा, मात्र कामगार सेनेची माघार

14 फेब्रुवारी : विविध बेस्ट कर्मचारी संघटनांनी आज मध्यरात्रीपासून संपाचा इशारा दिलाय. या संपकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी आज दुपारी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ चर्चा करणार. संपामुळे मुंबईकरांना त्रास होईल. मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून सर्व संपकरी संघटनांशी चर्चा करून मार्ग काढणार. संप करून प्रश्नं मिटणार नाही. चर्चेने मार्ग काढू असं आवाहान बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ यांनी केलंय.

दरम्यान, बेस्ट उपक्रमासाठी अर्थसंकल्पात तरतूद करून घेण्यास असमर्थ ठरलेल्या सत्ताधारी शिवसेनेने ४५० बसगाड्या भाड्याने घेण्याच्या प्रस्तावाला मान तुकवलीय. यामुळे बेस्ट कामगार कृती समितीने उद्या पुकारलेल्या संपात सामील होण्यास बेस्ट कामगार सेनेच्या नेत्यांनी नकार दिला आहे. कृती समितीमध्ये फूट पडली आहे. सत्ताधारी शिवसेनेला आपले अपयश झाकण्यासाठी या प्रस्तावास मंजुरी द्यावी लागली. त्यामुळे कोंडीत सापडलेल्या कामगार सेनेने संभाव्य संपातून माघार घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2018 11:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close