मुंबई, 23 नोव्हेंबर : कराची स्वीट्सचे नाव बदलण्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. अशातच 'भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशच्या विलीनीकरणातून जर एखादे नवी राष्ट्र निर्माण झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या या भूमिकेचं स्वागत करेल, असं विधान राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना नवाब मलिक यांनी वीज बिलाच्या मुद्यावर आंदोलन करणाऱ्या भाजपवर सडकून टीका केली. यावेळी पत्रकारांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी 'एक दिवस कराची हा भारताचा भाग असेल', असे विधान केले होते. याबद्दल सवाल विचारला असता, नवाब मलिक म्हणाले की, 'कराची एक दिवस भारताचा भाग असेल असं विधान ज्या पद्धतीने केले आहे. त्या पद्धतीने आम्हीही भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांचं विलीनीकरण होऊन एक देश झाला पाहिजे, जर बर्लिनची भिंत पाडली जाऊ शकते, तर मग भारत, पाक आणि बांगलादेश एकत्र का येऊ शकत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला, असं वृत्त दैनिक लोकमतने दिले आहे.
'चैत्यभूमीवर गर्दी नको, घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करा'
तसंच, 'उद्या जर भाजपने या तिन्ही देशांना एकत्र आणून एक राष्ट्र उभारात असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील त्यांच्या भूमिकेचं स्वागत करेल, असंही मलिक म्हणाले.
धारावीत चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; खाऊ देत असल्याचे सांगून तरुणाने...
'पहाटे बेईमानने पहाटे शपथविधी घेणाऱ्या घटनेला एक महिना पूर्ण होत आहे. त्यामुळे बेईमानीने सरकार कुणी स्थापन केले होते, हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे ज्यांचे बेईमानीचे उद्योग आहे, ते आमच्यावर आरोप करत आहे, हे अत्यंत हास्यास्पद आहे', अशी टीका मलिक यांनी भाजपवर केली.
मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही, सेनेच्या नेत्याची विखारी टीका
'लॉकडाउनच्या काळात ग्राहकांना हे जास्त वीज बिल आहे, अशा तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. महावितरणच्या तक्रार निवारण केंद्रात ग्राहकांचे वीज बिल तपासून ते कमी करण्यात यावे अशी सूचना देण्यात आली होती. पण, भाजप आज वीज बिल माफ करण्यासाठी आंदोलन करत आहे. मुळात भाजपने महावितरणमध्ये सर्वात जास्त थकबाकी करून ठेवली आहे. आघाडीचे सरकार असताना तेव्हा थकबाकी ही 20 हजार कोटी होती, भाजपने ही थकबाकी आता 60 हजार कोटींवर नेऊन ठेवली आहे', असा पलटवारही मलिक यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.