Home /News /mumbai /

Happy Friendship Day 2021 Messages: फ्रेंडशिप डे निमित्त शुभेच्छा देणारे मेसेज, Facebook, WhatsApp Status

Happy Friendship Day 2021 Messages: फ्रेंडशिप डे निमित्त शुभेच्छा देणारे मेसेज, Facebook, WhatsApp Status

Friendship Day 2021 Messages: फ्रेंडशिप डे निमित्त शुभेच्छा देणारे खास मराठमोळे मेसेजेस आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

  मुंबई, 31 जुलै: Friendship Day 2021 Facebook WhatsApp Marathi Messages: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी भारतात फ्रेंडशिप डे (Friendship Day) साजरा केला जातो. यंदाचा फ्रेंडशिप डे हा 1 ऑगस्ट 2021 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या खास दिवशी सर्वजण आपल्या मित्र मैत्रिणींना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देतात. फ्रेंडशिप बँण्ड बांधली जाते तर कुणी एकमेकांना गिफ्ट सुद्धा देतात. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व मित्र मैत्रिणींना तुम्हाला भेटणं शक्य होणार नाहीये. मात्र, असे असले तरी काळजी करण्याची गरज नाहीये. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वांना नियमांचे पालन करुनच सण-उत्सव साजरे करण्यात येत आहेत. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देऊ शकतात. मैत्री दिनाच्या म्हणजेच फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा (Happy Friendship Day) देणारे काही मेसेजेस सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियात व्हायरल होणारे हेच मेसेजेस (Friendship day viral messages) आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पाहूयात फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा देणारे काही खास मराठी मेसेजेस. फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा देणारे मेसेजेस (Friendship Day 2021 Messages in Marathi)

  मैत्री म्हटली की,

  आठवतं ते बालपण

  आणि मैत्रीतून मिळालेलं ते,

  खरंखुरं शहाणपण

  मैत्री दिनाच्या शुभेच्छा

  मित्र म्हणजे ऑक्सिजन,

  सलाईन, मेडीसीन,

  सगळं काही...

  मैत्री दिनाच्या शुभेच्छा

  प्रत्येक Problem वर

  Solution म्हणजे मैत्री

  मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  शब्दा पेक्षा सोबतीच

  सामर्थ्य जास्त असते

  म्हणून मैत्रीचे खरे समाधान

  खांद्यावरच्या हातात असते

  मैत्री दिनाच्या शुभेच्छा !!

  मित्र असा असावा !

  तिथे भेदभाव नसावा !!

  मैत्री दिनाच्या शुभेच्छा !!

  आयुष्य खूप सुंदर आहे

  फक्त सोबत मित्र हवेत

  मैत्री दिनाच्या सर्वांना शुभेच्छा

  निसर्गाला रंग हवा असतो

  फुलांना गंध हवा असतो

  माणूस हा एकटा कसा राहणार कारण...

  त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो

  सर्वांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा !

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Sunil Desale
  First published:

  पुढील बातम्या