मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'अखेरपर्यंत न्याय नाही मिळाला' खचलेल्या स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटुंबाने सोडला प्राण, मुंबईतील हृदय हेलावणारी घटना

'अखेरपर्यंत न्याय नाही मिळाला' खचलेल्या स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटुंबाने सोडला प्राण, मुंबईतील हृदय हेलावणारी घटना

सामूहिक आत्महत्येच्या घटनेने नवी मुंबई हादरली, संपूर्ण कुटुंबाने विष घेत संपवलं आयुष्य...

सामूहिक आत्महत्येच्या घटनेने नवी मुंबई हादरली, संपूर्ण कुटुंबाने विष घेत संपवलं आयुष्य...

Suicide in Mumbai: राहत्या घरावरून एका परिचयाच्या व्यक्तीसोबत सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्यात अखेरपर्यंत न्याय मिळाला, नसल्याची खंत व्यक्त करत एका स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली आहे.

नवी मुंबई, 02 नोव्हेंबर: राहत्या घरावरून एका परिचयाच्या व्यक्तीसोबत सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्यात अखेरपर्यंत न्याय मिळाला, नसल्याची खंत व्यक्त करत एका स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून संबंधित महिलेनं न्याय व्यवस्थेसह अन्य महत्त्वाच्या यंत्रणा आणि व्यक्तींवर नाराजी व्यक्त केली आहे. कायदेशीर लढ्यात अखेरपर्यंत न्याय मिळाला नसल्याचंही त्यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे. शनिवारी स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस येताच खळबळ उडाली आहे.

मोहिनी कामवायनी असं आत्महत्या करणाऱ्या 87 वर्षीय महिलेचं नाव असून त्या स्वातंत्र्यसैनिक नारायणदास कामवायनी यांच्या पत्नी आहेत. मोहिनी यांनी शनिवारी आपला मुलगा दिलीप (वय-67) आणि दिव्यांग मुलगी कांता (वय-65) यांच्यासह आत्महत्या केली आहे. मृत मोहिनी ह्या वाशी येथील सेक्टर 4 मध्ये आपल्या दोन मुलांसह वास्तव्याला होत्या. त्यांच्या परिचयाच्या एका व्यक्तीने त्यांचं घर बळकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याच्या राहत्या घरावरून परिचयाच्या व्यक्तीसोबत न्यायालयीन वाद सुरू होता.

हेही वाचा-अल्पवयीन मुलीवर सावत्र बापाकडून रेप; गुप्तांगात मिरची टाकून दिल्या नरक यातना

दरम्यान उच्च न्यायालयाने तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करत, आरोपीने नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला होता. पण नुकसान भरपाई ऐवजी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मोहिनी यांनी केली होती. यासाठी 2012 साली मोहिनी उपोषणाला बसल्या होत्या. तसेच राष्ट्रपतींना पत्र पाठवून न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा देखील दिला होता. पण 2016 नंतर हे प्रकरण लांबत गेलं.

हेही वाचा-पोत्यात आढळला महिलेचा मृतदेह; अंगातील गाऊन अन् पायातील दोरा उलगडणार मृत्यूचं गूढ

शेवटपर्यंत लढा देऊनही अपेक्षेप्रमाणे न्याय मिळत नसल्याने त्या खचून गेल्या होत्या. अखेर शनिवारी रात्री मोहिनी यांनी आपल्या दोन्ही मुलांसह विष प्राशन करून आपल्या जीवनाचा शेवट केला आहे. मोहिनी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत न्यायव्यवस्थेसह अन्य यंत्रणांवर नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित जुन्या प्रकरणात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांनी दिली आहे.

First published:

Tags: Crime news, Mumbai