मुंबईत रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय सेवा होणार बंद ?

मुंबईत रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय सेवा होणार बंद ?

रेल्वे स्टेशन्सवर सुरू असलेल्या मोफत वायफाय सेवेमुळे प्रवासी स्टेशनवर रेंगाळतात, वेटींगरुममध्ये बसुन राहतात, त्यामुळे स्टेशनवर गर्दी वाढते

  • Share this:

25 आॅक्टोबर : एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर स्टेशनवर सुरू असलेली मोफत वायफाय सेवा बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतलाय.

रेल्वे स्टेशन्सवर सुरू असलेल्या मोफत वायफाय सेवेमुळे प्रवासी स्टेशनवर रेंगाळतात, वेटींगरुममध्ये बसुन राहतात, त्यामुळे स्टेशनवर गर्दी वाढते. जिथपर्यंत वायफायची रेंज आहे, तिथपर्यंत प्रवासी वायफायसाठी थांबलेले असतात, त्यामुळे पश्चिम रेल्वेनं हा निर्णय घेतलाय.

स्टेशन्सवर लावलेल्या वायफायचं नेटवर्क हे फक्त प्लॅटफॉर्म आणि वेटींगरुममध्येच मिळतं, पादचारी पुलांवर वायफायचं नेटवर्क मिळत नाही, त्यामुळे प्रवाशांना वायफाय वापरायचं असेल तर पादचारी पुलावरुन प्लॅटफॉर्मवर किंवा वेटींग रुममध्ये यावं लागतं.

त्यामुळे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी वाढते. वायफाय बंद करण्याचा प्रस्ताव पश्चिम रेल्वेनं रेल्वे बोर्डाला पाठवलाय, बोर्डाकडून निर्णयाला मान्यता मिळताच पश्चिम रेल्वेची मोफत वायफाय सेवा बंद करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2017 08:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading