मुंबई, 25 ऑक्टोबर : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विजयादशमीच्या दिवशी शिवसेना मेळाव्यात भाजपवर घणाघात केला. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. गेल्या अनेक महिन्यातील खदखद व्यक्त करीत असल्याची भावना त्यांनी यावेळी केली. काही दिवसांपूर्वी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणापत्रात मोफत कोरोना लस दिली जाणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर भाजपवर टीका केली जात होती. त्यातच आज मुख्यमंत्र्यांनी यावर राग व्यक्त केला. केवळ बिहारमध्येच मोफत लस का? मग उरलेला देश पाकिस्तान आहे की बांग्लादेश. अशी वागणूक का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
आमच्या अंगणात तुळशी वृंदावने आहेत. गांजाची वृंदावने नाहीत.
माय मरो आणि मातृत्व जगो हे आमचे हिंदुत्व नव्हे.
घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचे. अशी काही रावणाची अवलाद, ठाकरे यांची कंगनावर टीका
आमच्या घरासमोर तुळशी वृंदावन असते गांजाची शेती तुमच्याकडे असते
मुंबई महाराष्ट्र पोलिस दल अभिमान
केवळ महाराष्ट्र पुढे जातो म्हणून बदनाम केले जाते
पाकव्याप्त हे जर देशात असेल तर पीएम यांचे पाप, आमचे पाप नाही
बिहार पूत्र लगेच झाला, गळे काढणारे महाराष्ट्र सरकारवर आणि आदित्य ठाकरे याच्यावर आरोप केले
मोहन भागवतांना राष्ट्रपती करा हे आम्ही सांगितले होते. ती सेना नको पण संघमुक्त करा असे म्हणणारे नितेश भाजपला चालतात