प्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे

प्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी जयंत पाटील आणि सातारा जिल्हातील शशिकांत शिंदे यांचं नाव चर्चेत आहे.

  • Share this:

मुंबई, 26 एप्रिल : चार वर्ष प्रदेशअध्यक्ष म्हणून काम केले आता मला जबाबदारी मुक्त केले तर बरं होईल अशी मागणीच राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी जयंत पाटील आणि सातारा जिल्हातील शशिकांत शिंदे यांचं नाव चर्चेत आहे.

येत्या २९ एप्रिलला पुण्यात राष्ट्रवादीच्या नवीन प्रदेश अध्यक्ष निवड होणारं आहे. त्याआधीच तटकरे यांनी  प्रदेश अध्यक्षपदी पुन्हा इच्छुक नसल्याच सांगत नवीन नियुक्त करावे असं सांगितलंय. पक्ष श्रेष्ठी यांना मी सांगितले आहे की मी चार वर्ष प्रदेश अध्यक्ष म्हणून काम केले आता मला जबाबदारी मुक्त केले तर बरं होईल. मी जितके वेळ द्यायचा तितका वेळ दिला. पक्ष वाढवण्यास प्रयत्न केले असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं.

तटकरेंनंतर कोण ?

तटकरे यांच्या जागी आता सांगलीतील जयंत पाटील आणि सातारा जिल्हातील शशिकांत शिंदे यांची नावे चर्चेत आहे. जयंत पाटील हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्याचवेळी सोबर चेहरा, अभ्यासू प्रतिमा ही जमेची बाजू आहे.

दुसरीकडे सातारा येथील शशिकांत शिंदे यांचं नाव चर्चेत आहे. शिंदे हे अजित पवार निकटवर्तीय आहे. माथाडी कामगार नेते आहे. त्यामुळे पाटील की शिंदे की अन्य कोण यांवर अंतिम निर्णय अध्यक्ष शरद पवार घेणार आहेत.

First published: April 26, 2018, 5:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading