Home /News /mumbai /

समृद्धी महामार्गात घोटाळा, माजी मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

समृद्धी महामार्गात घोटाळा, माजी मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

समृद्धी महामार्ग हा फडवणीसांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबई ते नागपूर असा महामार्ग असून तो फायबर ऑप्टिकलने युक्त राहणार आहे.

मुंबई 25 फेब्रुवारी : विधिमंडळाच्या अधिवेशाचा दुसराही दिवस आज चांगलाच गाजला. शेतकरी आणि महिला अत्याचारांच्या घटनांवरून विधानसभेचं कामकाज सुरु होताच भाजपने जोरदार घोषणाबाजी सुरु केली. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर सुनील केदार यांनी नागपूरमध्ये काय झालं त्यावर बोलायचं का असा सवाल फडणवीसांना केला. या गदारोळातच माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केला. समृद्धी महामार्गात घोटाळा झाल्याचं त्यांनी सभागृहात सांगितलं. पृथ्विराज चव्हाण म्हणाले, समृद्धी महामार्गसाठी स्टेट बँकेकडून 4 हजार कोटी कर्ज घेतलं होतं. खुल्या बाजारात 7:3 टक्के दराने कर्ज मिळत असताना बँकेला 9:74 दक्के व्याज देण्यात येतं आहे. हा मोठा घोटाळा आहे. सरकारने त्याची चौकशी करावी. तर याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्टिकरण एकनाथ शिंदे यांनी दिली. फडणवीस मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्गाचं काम हे एकनाश शिंदे यांच्या मंत्रालयाकडेच होतं. क्रिकेट खेळताना पाय मोडला, विद्यार्थी अ‍ॅम्बुलन्समधून थेट गेला परीक्षा केंद्रावर अधिसूचना जाहीर होण्यापूर्वीच जमिनी कशा खरेदी झाल्या तत्कालिन मुख्यमंत्री यांनी ही चौकशी गुंडाळली असा आरोपही पृथ्विराज चव्हाण यांनी केला. समृद्धी महामार्ग हा फडवणीसांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबई ते नागपूर असा महामार्ग असून तो फायबर ऑप्टिकलने युक्त राहणार असून या महामार्गाच्या बाजूलाच औद्योगिक कॉरीडॉरही तयार करण्यात येणार आहेत. महाविकास आघाडीविरोधात भाजपचं पहिलं आंदोलन, रस्त्यावर उतरून करणार निषेध नागपुरात महिलांवर अत्याचार झाले होते. भाजप नेत्यांनी आधी आत्मपरीक्षण करावं, उन्नव मध्ये काय झालं? नागपूर बस मध्ये काय झालं? महिला अत्याचा बाबत मी उपोषण बसलो, तेंव्हा भाजप आमदार का पळाले? असा सवालही सुनील केदार यांनी भाजपला केला.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Samrudhi highway

पुढील बातम्या