Home /News /mumbai /

मुख्यमंत्र्यांच्या खोट्या सहीची पत्रं देणारा बडतर्फ लिपिक दिनेश शिर्के अटकेत

मुख्यमंत्र्यांच्या खोट्या सहीची पत्रं देणारा बडतर्फ लिपिक दिनेश शिर्के अटकेत

मुख्यमंत्र्यांच्या नावे बनावट सहीची पत्रं देणारा पुण्यामधला बडतर्फ लिपिक दिनेश शिर्के याला अटक करण्यात आली आहे.

17 एप्रिल : मुख्यमंत्र्यांच्या नावे बनावट सहीची पत्रं देणारा पुण्यामधला बडतर्फ लिपिक दिनेश शिर्के याला अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या बनावट सही करून शिर्के अधिकाऱ्यांना खोटी नियुक्तीपत्रं द्यायचा. भूमी अभिलेख कार्यालयातील सहा अधिकाऱ्यांचे बनावट बदलीचे आदेश त्यानं बनवले होते. तर एका बदलीसाठी तो पाच लाख रूपये घ्यायचा. बडतर्फ केल्यानंतरही तो बदल्या करून देणारा एजंट म्हणून मंत्रालयात वावरत होता. या प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयातील कार्यरत लिपिकालाही अटक होण्याची शक्यता आहे. मंत्रालयात बदल्यांचं रॅकेट कसं चालतं यावरही प्रकाश पडलाय.
First published:

Tags: मुख्यमंत्री

पुढील बातम्या