मंत्रालयात चौथ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न; कर्मचाऱ्याने केलं विषप्राशन

मंत्रालयात चौथ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न; कर्मचाऱ्याने केलं विषप्राशन

शासकीय कर्मचारी दिलीप सोनवणे यांनी उद्योग विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांच्या दालनात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

  • Share this:

मुंबई, 12 ऑक्टोबर : मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न झालाय. शासकीय कर्मचारी दिलीप सोनवणे यांनी उद्योग विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांच्या दालनात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तात्काळ हॉस्पिटलला हलवले.

शुक्रावारी मंत्रालयात परत एकदा आत्महत्येचा प्रयत्न झाला. शासकीय कर्मचारी दिलीप सोनवणे यांनी उद्योग विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांच्या दालनात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले आणि उपचारार्थ रुग्णालयात हलवीले. या प्रकारामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली होती.

यापूर्वीसुद्धा जानेवारी 2018 मध्ये धर्मा पाटील या 80 वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर फेब्रुवारी महिन्यात मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून हर्षल रावते या तरूणाने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आणि त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

त्यानंतर जून 2018 मध्ये गौतम चव्हाण या व्यक्तीने मंत्रालयाच्या गेटसमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. झोपडपट्टी पुर्नविकास योजनेतील प्रलंबित कामासाठी गौतम चव्हाण हे मंत्रालयात आले होते. पण काम होत नसल्यामुळे रागाच्या भरात त्यांनी मंत्रालयाच्या प्रवेश द्वारातच विष प्राशान केलं होतं. सुरक्षारक्षकांनी धाव घेऊन गौतम चव्हाणांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण विष प्यायल्यामुळे त्यांना तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.

 VIDEO भयंकर! भारतातल्या 'तितली'सह जगभरात ३ चक्रीवादळांचं असं सुरू आहे थैमान

First published: October 12, 2018, 6:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading