डोंबिवली : कुत्रा ओरडतो म्हणून 4 महिलांनी मिळून केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू

डोंबिवली : कुत्रा ओरडतो म्हणून 4 महिलांनी मिळून केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू

डोंबिवलीच्या मानपाडा रोडवरील एका चाळीत राहणाऱ्या नागम्मा शेट्टी या महिलेकडे एक पाळीव कुत्रा होता.

  • Share this:

डोंबिवली, 11 फेब्रुवारी : पाळीव कुत्र्याचा ओरडण्याचा त्रास झाल्यानं शेजाऱ्यांनी महिलेला मारहाण केली आणि त्यात महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. याप्रकरणी उशिरा जाग्या झालेल्या पोलिसांनी तब्बल २४ तासांनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

डोंबिवलीच्या मानपाडा रोडवरील एका चाळीत राहणाऱ्या नागम्मा शेट्टी या महिलेकडे एक पाळीव कुत्रा होता. मात्र, हा कुत्रा सतत ओरडत असल्यानं आम्हाला त्रास होत असल्याची शेजाऱ्यांची तक्रार होती. यावरून सोमवारी रात्री नागम्मा आणि तिच्या शेजाऱ्यांमध्ये वाद झाले. यानंतर शेजारच्या चार महिलांनी मिळून नागम्माला मारहाण केली, ज्यात तिचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर मानपाडा पोलिसांनी साधी एनसीदेखील नोंदवून घेतली नाही. त्यामुळे या महिलेच्या पोरक्या झालेल्या चार मुलींनी भाजपच्या महिला ग्रामीण शहराध्यक्ष मनीषा राणे यांच्याकडे धाव घेत व्यथा मांडली.

भाजपनं याप्रकरणी पोलिसांना जाब विचारताच पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेला तब्बल २४ तासांनी सुरुवात केली. मात्र, अद्याप याप्रकरणी कुणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही. त्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

लोकल येताच अल्पवयीन मुलीने मारली ट्रॅकवर उडी, पाहा हा VIDEO

दरम्यान, बदलापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीने लोकलसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बदलापूर रेल्वे स्थानकात घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. बदलापूर रेल्वे स्थानकात बदलापूर लोकल शिरत असताना अचानक एक मुलगी अचानक फलाटावरून ट्रॅकवर उतरली. यावेळी मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक मारले. मात्र, तरुणीला लोकलची हलकीशी धडक बसली आणि ती खाली पडली.

यानंतर मोटरमनने या मुलीला बाहेर काढत पाणी पाजून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं. तिच्या चौकशीत ही मुलगी अल्पवयीन असल्याचं समोर आल्यानं रेल्वे पोलिसांनी तिच्या पालकांना बोलावून समजूत काढून मुलीला त्यांच्या ताब्यात दिलं. या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

First published: February 11, 2020, 11:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या