अनिल पाटील,(प्रतिनिधी)
पणजी,9 जानेवारी: गोवा आणि कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या म्हादई अभयारण्यातील गोळावली जंगलात चार पट्टेदाररी वाघांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. या हत्या विष प्रयोगाने केल्याचा प्राथमिक अंदाज वन अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. या हत्या झालेल्या वाघांमध्ये एक वाघीण आणि पूर्ण वाढ झालेला तीन वाघांचा समावेश आहे. काही वाघ मारून पुरले होते. या घटनेमुळे संपूर्ण वन विभाग आणि राज्य प्रशासन हादरले आहे.
याप्रकरणी आतापर्यंत वनविभाग आणि गोवा पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. वनविभागाने टास्क फोर्स उभा करून सर्वत्र कोम्बिंग ऑपरेशन राबवून तपास सुरू केला आहे. राज्य प्रशासनाने विशेष समिती स्थापन केली असून लवकरात लवकर या संपूर्ण घटनेचा तपशील आणि अहवाल देण्याचे आदेश राज्य प्रशासनाने दिले आहेत.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.