मुंबई, 04 ऑक्टोबर: मुंबईतील कलबादेवी परिसरात काल रात्री दहाच्या सुमारास एक चार मजली इमारत कोसळल्याची (four storey building collapsed in Kalbadevi area of mumbai) घटना समोर आली आहे. अवघ्या क्षणार्धात घडलेल्या या दुर्घटनेत एका 61 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला (1 Death) आहे. विशेष म्हणजे काल सायंकाळपर्यंत अग्निशमन दलाने ही इमारत रिकामी केली होती. त्यामुळे सुदैवानं मोठी जीवितहानी टळली आहे. पण याच परिसरातील रहिवासी असणाऱ्या एका मजूर व्यक्तीचा यामध्ये दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेचा लाइव्ह व्हिडीओ (Viral video) समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होतं आहे.
मुंबईतील कलबादेवी परिसरातील ही चार मजली इमारत जीर्ण झाली होती. या चार मजली इमारतीत जवळपास 100 कुटुंब वास्तव्याला होती. काल सायंकाळी संबंधित इमारतीचा काही भाग कोसळला होता. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर धोका ओळखून अग्निशमन दलाच्या जवानांनी या इमारतील सर्व कुटुंबाना सुरक्षित बाहेर काढलं होतं. तसेच ही इमारत रिकामी केली होती. त्यानंतर काल रात्री दहाच्या सुमारास ही इमारत कोसळली आहे.
वयोवृद्धाला जागेवरून उठायचीही नाही मिळाली संधी; क्षणात 4 मजली इमारत जमीनदोस्त, थरारक घटनेचा LIVE VIDEO pic.twitter.com/KvzPEvtiHc
— News18Lokmat (@News18lokmat) October 4, 2021
काल रात्री उशीरा याच परिसरातील रहिवासी असणारा एक हातगाडी चालक मजूर या इमारतीजवळ येऊन बसला होता. येथील एका भींतीवर बसून तो आपल्या मोबाइलमध्ये काहीतरी पाहत होता. दरम्यान अचानक काही कळायच्या आत ही इमारत कोसळली आहे. संबंधित वयोवृद्धाला जागेवरून उठायची संधी देखील मिळाली नाही. ही जीर्ण इमारत वयोवृद्धाच्या अंगावर कोसळून यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हेही वाचा-वसईत पैशाचा पाऊस? रस्त्यावर लाखोंच्या नोटांचा खच, पाहा VIDEO
ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमी अवस्थेत असणाऱ्या वृद्धाला बाहेर काढलं. त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai