मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /असंवेदनशीलतेने जीवंत बाळाला संपवलं, नायर रुग्णालयात जिवाच्या आकांताने रडणाऱ्या 'त्या' चिमुकल्याचा मृत्यू

असंवेदनशीलतेने जीवंत बाळाला संपवलं, नायर रुग्णालयात जिवाच्या आकांताने रडणाऱ्या 'त्या' चिमुकल्याचा मृत्यू

सिलेंडरच्या स्फोटात जखमी झालेल्या चार महिन्यांच्या बाळाचा मुंबईच्या नायर रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. या बाळाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओत ते बाळ उपचाराअभावी जिवाच्या आकांताने रडत असताना दिसलं होतं.

सिलेंडरच्या स्फोटात जखमी झालेल्या चार महिन्यांच्या बाळाचा मुंबईच्या नायर रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. या बाळाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओत ते बाळ उपचाराअभावी जिवाच्या आकांताने रडत असताना दिसलं होतं.

सिलेंडरच्या स्फोटात जखमी झालेल्या चार महिन्यांच्या बाळाचा मुंबईच्या नायर रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. या बाळाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओत ते बाळ उपचाराअभावी जिवाच्या आकांताने रडत असताना दिसलं होतं.

पुढे वाचा ...

मुंबई, 1 डिसेंबर : मुंबईच्या नायर रुग्णालयातील (Mumbai Nair Hospital) एक व्हिडीओ काल (30 नोव्हेंबर) दिवसभर सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला होता. संबंधित व्हिडीओत एक चार महिन्यांचं बाळ जिवाच्या आकांताने रडताना दिसत होतं. त्या बाळाचा आज मृत्यू झाल्याची वेदनादायी बातमी आता समोर आली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या असंवेदनशील कारभारामुळे त्या बाळाचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येतोय. या प्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC mayor Kishori Pednekar) यांनी या प्रकरणी कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

वरळीतील गणपतराव जाधव मार्गावर स्थित कामगार वसाहतीत बीडीडी चाळीतील एका खोलीमध्ये काल सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. यामध्ये चार महिने वय असलेल्या एका बाळासह पाच वर्षे वयाचा मुलगा, एक महिला (वय वय 25) आणि एक पुरुष (वय 27) असे चौघे जण भाजले होते. संबंधित घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महानगरपालिकेचं अग्नीशमन दल, विभाग कार्यालयातील यंत्रणा तसेच पोलीस यांनी मदतकार्य करुन चारही रुग्णांना नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण नायर रुग्णालयात या जखमींच्या उपचारामध्ये दिंरगाई करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या संबंधिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओतील डॉक्टर आणि पारिचारीकांची असंवेदनशीलता पाहून काळीज पळवटून जाईल.

हेही वाचा : चेष्टा-मस्करी पडली महागात, पुण्यात मित्रानेच केले मित्रावर चाकूने सपासप वार

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत नेमकं काय होतं?

संबंधित घटनेबाबत जो व्हिडीओ व्हायरल होतोय त्यामध्ये डॉक्टर, नर्सेस दिसत आहेत. व्हिडीओ बनवणारा व्यक्ती रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करत आहेत. व्हिडीओत एक व्यक्ती भाजलेला आहे. तो वेदनांनी प्रचंड व्हिव्हळताना दिसतोय. त्याचबरोबर एक चार महिन्यांचं बाळ खूप जिवांच्या आकांताने रडतंय. या बाळाला देखील भाजलेलं दिसतंय. पण डॉक्टर, नर्सेस कुणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीय. हा सगळा थरार कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे. संबंधित व्हिडीओ हा खरंच थरकाप उडवणारा असाच आहे. व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने रुग्णांना तासाभरापासून तसंच ताटकळत ठेवलं असल्याचा आरोप केला आहे. आता याच व्हिडीओ प्रकरणी चौकशी होणार आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग

संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला खळबळून जाग आली. संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) तथा नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी या प्रकरणी खाते अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत. नायर रुग्णालयाचे उप अधिष्ठाता सदर दिरंगाई प्रकाराची चौकशी करणार आहेत. चौकशी अंती कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार व कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

'इतकं असंवेदनशील असूच नये'

या प्रकरणावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी 'न्यूज 18 लोकमत'ला प्रतिक्रिया दिली. "मला उशिरा हे प्रकरण कळलं. इतकं असंवेदनशील असूच नये. मला याबद्दल काहीच बोलता येत नाहीय. सिलेंडरचा स्फोट होऊन बाळ होरपळलं तर त्याच्यावर त्वरित उपचार होणं अपेक्षित होतं. सिलेंडरच्या स्फोटानंतर बाळावर करण्यात आलेली उपचारपद्धती ती मी स्वत: जावून बघणार आहे. या प्रकरणी जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. ज्यावेळी रुग्ण आपल्याकडे येतात त्यावेळी डॉक्टर कसे वागतात ते सगळं मलाही चेक करावं लागेल", अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.

हेही वाचा : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे एका मंत्र्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

"संबंधित व्हिडीओत डॉक्टर, नर्सचा स्टाफ अतिशय रिलॅक्स मोडमध्ये बघायला मिळत आहे. तो व्हिडीओ नेमका कधीचा आहे ते देखील बघावं लागेल. पण अशी असंवदेनशील गोष्ट घडली असेल तर जबाबदारांवर कारवाई व्हायलाच हवी. कारण मी सुद्धा एक आई आहे", असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

रुग्णालयात गेल्यावर मला बघताच क्षणी कळेल. मी पुढच्या एक तासात रुग्णालयात पोहोचणार आहे. या प्रकरणात जर हलगर्जीपणा दिसला तर तो खपवून घेतला जाणार नाही. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. आपल्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आपण डॉक्टरांना देव मानतो. पण अशी अक्षम्य चूक चालणार नाही. असंवेदनशीलता कुठेच असता कामा नये. सगळ्या गोष्टी तपासणार, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

First published:
top videos