मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; चार कर्मचारी विरोधात देणार साक्ष, होणार मोठा खुलासा

राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; चार कर्मचारी विरोधात देणार साक्ष, होणार मोठा खुलासा

Raj Kundra Case: बिझनेसमन राज कुंद्रा (Raj Kundra) पॉर्नोग्राफी प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत.

Raj Kundra Case: बिझनेसमन राज कुंद्रा (Raj Kundra) पॉर्नोग्राफी प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत.

Raj Kundra Case: बिझनेसमन राज कुंद्रा (Raj Kundra) पॉर्नोग्राफी प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 25 जुलै: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि बिझनेसमन राज कुंद्रा (Raj Kundra) पॉर्नोग्राफी प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. त्यातच आता राज कुंद्रा आणखी गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. राजच्या अडचणीत आणखीन वाढ होणार आहे. कारण राज कुंद्राचे कर्मचारीच साक्षीदार बनणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पोर्न फिल्म रॅकेटमध्ये मालमत्ता विक्री विभागाला (Property Sale)मोठं यश मिळालं आहे. कारण राज कुंद्राचे चार कर्मचारीच त्याच्याविरोधात साक्ष देणार आहेत. कशाप्रकार हे रॅकेट चालायचं याची संपूर्ण माहिती कर्मचाऱ्यांनी प्रॉपर्टी सेलला दिली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

पोलिसांच्या हाती लागली गुप्त तिजोरी

क्राईम ब्रांचने (Mumbai crime branch)दोन दिवसांपूर्वी राजच्या अंधेरी येथील वियान इंडस्ट्रीज या कंपनीच्या ऑफिसवर छापा मारला होता. या झडतीमध्ये पोलिसांच्या हाती एक गुप्त तिजोरी लागली. या तिजोरीमध्ये अनेक महत्वाच्या फाईल ठेवल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या फाईलमध्ये राजने ब्रिटीश कंपनीसोबत केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती आहे.

Breaking News: बचावकार्य बोटच अडकली पुराच्या पाण्यात, Live Video

राज कुंद्रा चालवत असलेली ॲडल्ट वेबसाईट ‘हॉटशॉट’च्या (Hotshot) कंटेंट साठी रोज नवा व्हॉट्सॲप ग्रुप बनवला जायचा असाही खळबळजनक खुलासा या प्रकरणात समोर आला आहे. त्यामुळे सायबर क्राईम ब्रांच (Crime branch) कडून वाचण्यासाठी सगळी तयारी करण्यात येत होती हे ही आता समोर येत आहे

First published:

Tags: Raj kundra, Shilpa shetty