बोरीवलीजवळ रेल्वे रुळ ओलांडताना चार भावांचा लोकलच्या धडकेत मृत्यू

बोरीवलीजवळ रेल्वे रुळ ओलांडताना चार भावांचा लोकलच्या धडकेत मृत्यू

पोईसर, कांदीवली येथे सिंग्नलला लोकल थांबली होती. तेव्हा या चारही भावंडांनी लोकलमधून उड्या मारून रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

मुंबई, 14 मे : कांदीवली आणि बोरीवली स्थानकादरम्यान रेल्वे रुळ ओलांडताना चार  भावांचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीये.

सागर संपत चव्हाण (वय 23), साईप्रसाद मनोहर चव्हाण (वय 17),मनोज दिपक चव्हाण (वय 17), दत्तप्रसाद दिपक चव्हाण (वय 20) असं मृत तरुणांची नाव आहे. हे चारही भाऊ कणकवलीहुन मुंबईत आले होते.

कांदीवली इथं आपल्या घरी बोरीवली इथं लोकलने येत होते. पोईसर, कांदीवली येथे सिंग्नलला लोकल थांबली होती. तेव्हा या चारही भावंडांनी लोकलमधून उड्या मारून रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलची या भावंडांना धडक बसली. जखमी अवस्थेत चौघांना बोरीवली स्टेशनवरील ईएमआर रूममध्ये आणले असताना डाॅक्टरांनी चारही तरुणांना मृत घोषित केलं.

या प्रकरणी बोरीवली रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलीये.

First published: May 14, 2018, 4:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading