आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचे निधन

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचे निधन

दलित पँथरचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, लेखक राजा ढाले यांचे आज (मंगळवारी)सकाळी मुंबईत निधन झाले.

  • Share this:

मुंबई, 16 जुलै: दलित पँथरचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, लेखक राजा ढाले यांचे आज (मंगळवारी)सकाळी मुंबईत निधन झाले. ढाले यांनी अरुण कृष्णाजी कांबळे आणि नामदेव ढसाळ यांच्या मदतीने दलित पँथरची स्थापन केली होती. त्याआधी ते भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या ढाले गटाचे प्रमुख होते.

मंगळवारी पहाटे विक्रोळीतील राहत्या घरी ढाले यांचे निधन झाले. उद्या दुपारी 12 वाजता विक्रोळीतून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यानंतर दादरच्या चैत्यभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

राजा ढाले यांच्या निधनाची वृत्त कळताच आंबेडकरी जनतेत तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजा ढाले यांच्या निधनाची वृत्त कळताच तीव्र शोक व्यक्त केला आहे. राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथरचा महानायक हरपला आहे, अशी शोकभवना व्यक्त करून रामदास आठवले यांनी ढाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

फेसबुकवरील मैत्रीनं केला घात; पाहा पुण्यातील महिलेसोबत काय घडलं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 16, 2019 08:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...