मुंबई, 27 सप्टेंबर : एकीकडे महाविकास आघाडी सरकारच्या (mva government) मंत्र्यांवर भाजप नेत्यांनी गंभीर आरोप केले आहे. तर दुसरीकडे काही काही मंत्र्यांना ईडीने समन्स (Summoned by the ED) बजावला आहे. आता शिवसेनेला (shivsena) यात आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ(Anandrao Adsul) यांना ईडीचे (ed) अधिकारी चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे माजी खासदार आणि सीटी बँकेचे अध्यक्ष (andandrao adsul city bank scam) आनंदराव अडसूळ यांच्या घरी आज ED च्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी धाड टाकली. यावेळी आनंदराव अडसूळ यांना ED चे अधिकारी अधिक चौकशीसाठी ताब्यात घेणार अशीही चर्चा सुरू झाली होती.
मात्र आनंदराव अडसूळ यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना गोरेगावमधील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये ED चे अधिकारी आणि सुरक्षा रक्षकही तैनात आहेत. यावेळी आनंदराव अडसूळ यांचे कुटुंबीय देखील त्यांच्या सोबत हाँस्पिटलमध्ये आहेत.
आज सकाळी 10 वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आनंदराव अडसूळ गेले 9 तास हाँस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती ठिक झाल्यावरच त्यांना ED चे अधिकारी चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
अडसूळ यांच्यावरील आरोप
सिटी बँकेत 900 कोटींच्या घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप आहे. भाजप आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ईडी त्यांची चौकशी करणार आहे. आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे.
5 जानेवारी रोजी बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप केला. अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्र सादर करण्यासाठी राणा ईडीच्या कार्यालयातही गेले होते. मुंबईमध्ये सिटी को-ऑप बँकेच्या 13 ते 14 शाखा आहेत. या बँकेत 900 खातेदार असून ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटण्यात आलेलं कर्ज कारणीभूत असल्याचा आरोप रवी राणा यांच्याकडून करण्यात आला होता. अडसूळ यांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. खातेदारांना फक्त एक हजार एवढी रक्कम मिळत असल्याचंही रवी राणा यांनी आपल्या आरोपात म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.