मुंबई, 06 एप्रिल : 36 दिवसांमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील (MVA Government)दोन मंत्र्यांची विकेट घेतल्यानंतर भाजपने (BJP)आता शिवसेनेला (Shivsena)आणखी एक धक्का दिला आहे. शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत (Trupti Sawant)यांनी सेनेला जय महाराष्ट्र म्हणत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे.
तृप्ती सावंत यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, नितेश राणे, अतुल भातखळकर आणि इतरही नेते यावेळी उपस्थित होते.
corona संचारबंदीचं उल्लंघन पडलं महागात; पोलिसांच्या शिक्षेने तरुणाचा मृत्यू
तृप्ती सावंत यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्याने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला होता. या लढतीत काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दीकी विजयी झाले होते. तृप्ती या शिवसेनेचे माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आहे. 2015 मध्ये बाळा सावंत यांच्या निधनाने रिक्त झालेल्या वांद्रे पूर्व जागेवर तत्कालीन काँग्रेस नेते नारायण राणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. अत्यंत प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला होता.
INSIDE STORY : गृहमंत्र्यांची खुर्ची आणि शरद पवार अजितदादांची 'ती' बैठक!
2019 च्या विधानसभा निवडणुकीत तृप्ती सावंत यांनी उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. पण, या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आता तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.