Home /News /mumbai /

ही जबाबदारी घेणार कोण?, पहिल्यांदाच रेल्वेकडून असं उत्तर... म्हणून आधीच्या रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारीने काम केलं, आदित्य ठाकरेंचा दानवेंवर हल्लाबोल

ही जबाबदारी घेणार कोण?, पहिल्यांदाच रेल्वेकडून असं उत्तर... म्हणून आधीच्या रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारीने काम केलं, आदित्य ठाकरेंचा दानवेंवर हल्लाबोल

प्रवासासाठी प्रवेश करणाऱ्यांची जबाबदारी राज्यानं घ्यावी, असे मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं. त्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 09 ऑगस्ट: येत्या 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल (Mumbai Local Train) सुरु होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी काल यासंदर्भातली घोषणा केली. त्यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत केलं. मात्र पण लसी (Corona Vaccine) संदर्भात सर्व डाटा राज्य सरकारकडे आहे. त्यामुळे प्रवासासाठी प्रवेश करणाऱ्यांची जबाबदारी राज्यानं घ्यावी, असे मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं. त्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्यांदाच रेल्वेकडून असं उत्तर आलंय की 'ही जबाबदारी घेणार कोण ?' म्हणून आधीचे रेल्वे मंत्री होते त्यांनी जबाबदारीने काम केलं होतं. मुंबईसाठी तेव्हा मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टी सुचवल्याप्रमाणे त्यांनी केलं होतं, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. रावसाहेब दानवेंचा लसीकरणाला विरोध आहे का? त्यांचे राजकारण आहे की अकार्यक्षमता आहे हे मला माहित नाही. आतापर्यंत रेल्वेचे प्रशासन, मंत्री यांनी पूर्णपणे गेले दीड वर्ष सहकार्य केलं होतं आणि मला खात्री आहे केंद्रीय कॅबिनेट मंत्री यात सहकार्य करतील, असंही आदित्य ठाकरे म्हणालेत. नवजात बाळाला दिले विहिरीत फेकून, गावात चर्चा झाली अन् धक्कादायक कारण आले समोर वादात जायच नाही- आदित्य ठाकरे पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्हाला कोणत्याही वादात जायचं नाही. रेल्वे आम्हाला सहकार्य करेल अशी अपेक्षा आहे. आम्हाला श्रेयवादात न पडता जनतेसाठी कामं करायची आहेत. ज्यांना कोणाला श्रेय घ्यायचा आहे, त्यांनी घ्यावे. मुख्यमंत्री, महाविकास आघाडीचे सरकार श्रेयासाठी काम करत नाही. लोकांची गैरसोय होऊ नये आणि त्याहून महत्वाचं म्हणजे लोकांचे जीव जाऊ नये असं आम्हाला वाटत आहे. दोन डोस घेण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. आपण लसीकरण वाढवतोय. लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यत कोणीही सुरक्षित नाही. पालिकेकडून सर्टिफिकेट मिळेल आणि ऍपमध्ये नोंदणी होईल त्या लोकांना आपण परवानगी देतोय, लवकर अॅप तयार होईल, अशी माहितीही आदित्य ठाकरेंनी यावेळी दिली. Online Shopping वेळी फ्रॉड झालाय? अशी करा तक्रार आज टास्क फोर्ससोबत बैठक आहे. एकदम सगळं उघडल्यामुळे रुग्णसंख्या मागच्यावेळी वाढली होती. काही देशात तिसरी लाट आली आहे. रुग्ण व्यवस्था आपण वाढवतोय. त्यामुळे 15 -15 दिवसांच्या टप्यांनी शिथिलता दिली जाईल. रेल्वे प्रवास 15 तारखेपासून दोन डोस घेतलेल्याना दिलेला असल्याचं असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Aaditya thackeray, Mumbai local, Raosaheb Danve

पुढील बातम्या