मुंबई, 26 जानेवारी : केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची (padma awards 2021) घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील फक्त 6 जणांना पुरस्कार देण्यात आल्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'जपानने भारताला बुलेट ट्रेन दिली आहे. त्याबद्दल त्यांच्या माजी पंतप्रधानांना पद्म पुरस्कार देण्यात आला असावा, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी पद्म पुरस्कारावरून मोदी सरकारवर टीका केली आहे.
'जे पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत ते काबिल असतील मी त्यांचं स्वागत करतो. इतकं मोठं राज्य आहे लोक इतकं काम करतात, पण फक्त 6 लोकांना पुरस्कार महाराष्ट्र मधील लोकांना मिळाला आहे. इतर राज्यातील नावं पाहिली आहे. दर वर्षी 10 ते 12 लोकांना सन्मान देण्यात येतो आणि महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त 6 पुरस्कार? असा संतप्त सवाल राऊत यांनी विचारला.
नवऱ्याच्या स्वप्नात आला लॉटरीचा नंबर, या महिलेने जिंकला 340 कोटींचा जॅकपॉट
महाविकास आघाडी सरकारकडून ज्या नावांची शिफारस करण्यात आली होती. ती नावं यात होती की नाही ते पाहावे लागणार आहे. राज्य सरकारकडून काही नावांची शिफारस केली जाते. ज्या सहा जणांना पुरस्कार देण्यात आली आहे, मला वाटतं त्यातलं एक ही नाव यादीतले नसेल, असा दावाही राऊत यांनी केला.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पुरस्कार देण्यात आला आहे, असा सवाल विचारला असता राऊत म्हणाले की, 'जपानने आपल्याला बुलेट ट्रेन दिली आहे. त्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आला असावा, जी बुलेट ट्रेन महाराष्ट्रने नाकारली'
LIC Policy: दररोज 160 रुपयांच्या बचतीवर मिळतील 23 लाख रुपये;जाणून काय आहे पॉलिसी
दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. 119 जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. या पुरस्कारांसाठी महाविकास आघाडी सरकारकडून 98 जणांची यादी पाठवण्यात आली होती. परंतु, यापैकी फक्त एकाच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. उर्वरीत 97 नावावर केंद्र सरकारने फुली मारली आहे.
राज्य सरकारकडून 'पद्मविभूषण' पुरस्कारासाठी उद्योगपती मुकेश अंबानी, सुनील गावस्कर यांच्या नावाची शिफरस केली होती. तसंच 'पद्मभूषण' पुरस्कारासाठी सिंधुताई सपकाळ, 'सीरम' इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेते मोहन आगाशे, स्कायडायव्हर शीतल महाजन, कै. राजारामबापू पाटील व डॉ. मिलिंद कीर्तने यांची नावे सुचावली होती. परंतु, केंद्राकडून पद्मभूषण ऐवजी पद्मश्री पुरस्कार सिंधुताईंना देण्यात आला. पद्मश्री पुरस्कारासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, यशवंतराव गडाख, डॉ. जगन्नाथ दीक्षित, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्यासह 88 नावे पाठवली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.