मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांना विधानभवनात प्रवेश नाकारला, सोबत होते 20 आमदार!

काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांना विधानभवनात प्रवेश नाकारला, सोबत होते 20 आमदार!

अर्थसंकल्पीय भाषण ऐकण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण आपल्या 20 ते 25 आमदारांसह विधानभवनात दाखल झाले आहे.

अर्थसंकल्पीय भाषण ऐकण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण आपल्या 20 ते 25 आमदारांसह विधानभवनात दाखल झाले आहे.

अर्थसंकल्पीय भाषण ऐकण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण आपल्या 20 ते 25 आमदारांसह विधानभवनात दाखल झाले आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 08 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit pawar) हे अर्थसंकल्प (Maharashtra budget)सादर करणार आहे. कोरोनाच्या (Corona) परिस्थितीमुळे विधानभवनात (vidhan bhavan) चाचणी केल्याशिवाय येण्यास मनाई आहे. याचा फटका काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांना बसला आहे.

अर्थसंकल्पीय भाषण ऐकण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण आपल्या 20 ते 25 आमदारांसह विधानभवनात दाखल झाले आहे. पण या सर्व आमदारांनी कोरोनाची चाचणी न केल्यानं त्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्र्यांनाच विधानभवनात प्रवेश न दिल्यामुळे सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘या’देशांनं सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास घातली बंदी, सार्वमतानंतर निर्णय

सपाचे आमदार अबू आझमी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना विधानभवनात येण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे.

'पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह 20 ते 25 आमदारांना प्रवेश देण्यात यावा. त्यांना दुसऱ्यांदा कोरोना चाचणी करण्याची माहिती त्यांना दिलेली नव्हती. त्यामुळे काही तरी गोंधळ निर्माण झाला आहे.  आज अर्थसंकल्पाचा दिवस असल्यानं त्यांना विधानभवनात बसण्याची परवानगी द्यायला हवी, अशी मागणीही अबू आझमी यांनी केली.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आग्रही

दरम्यान, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपद सोडल्यामुळे रिक्त झालेल्या जागेच्या निवडीबद्दल पेच निर्माण झाला आहे. आज अधिवेशनात निवडणुकीबद्दल नोटीस काढण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

Women's Day Special:'ती'च्या कार्याला अनोखा सलाम;आनंद महिंद्रांनी शेअर केलाVIDEO

विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत काँग्रेस पक्षाकडून संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर, अमिन पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. तर अध्यक्षपदासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या नावाचा ही विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नितीन राऊत मात्र अध्यक्षपद निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत. मंत्रिपद कायम ठेवावे यासाठी राऊत आग्रही असल्याची माहिती आहे.

First published: