मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /लुंगीनं पेट घेतल्यानं माजी आयुक्तांचा होरपळून मृत्यू; मुंबईतील दुर्दैवी घटना

लुंगीनं पेट घेतल्यानं माजी आयुक्तांचा होरपळून मृत्यू; मुंबईतील दुर्दैवी घटना

मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त (Former commissioner of mumbai) के. नलिनाक्षन (K. Nalinakshan) यांचं शुक्रवारी पहाटे एका दुर्दैवी अपघातात निधन (Death) झालं आहे.

मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त (Former commissioner of mumbai) के. नलिनाक्षन (K. Nalinakshan) यांचं शुक्रवारी पहाटे एका दुर्दैवी अपघातात निधन (Death) झालं आहे.

मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त (Former commissioner of mumbai) के. नलिनाक्षन (K. Nalinakshan) यांचं शुक्रवारी पहाटे एका दुर्दैवी अपघातात निधन (Death) झालं आहे.

मुंबई, 10 जुलै: मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त (Former commissioner of Mumbai) के. नलिनाक्षन (K. Nalinakshan) यांचं शुक्रवारी पहाटे एका दुर्दैवी अपघातात निधन (Death) झालं आहे. राहत्या घरात दरवाजा बंद करून पूजा करत असताना लुंगीला आग लागल्यानं नलिनाक्षन यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटना उघडकीस येताच त्यांना त्वरित भायखळा येथील मसीना रुग्णालात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण याठिकाणी उपचारादरम्यान नलिनाक्षन यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते 79 वर्षांचे होते.

मृत नलिनाक्षन हे चर्चगेट येथील ‘ए’ मार्गावरील शर्विले इमारतीत आपल्या कुटुंबासोबत राहत होते. दरम्यान बुधवारी, 7 जुलै रोजी नेहमीप्रमाणे ते घरातील देवघरात पूजा करण्यासाठी गेले. दरवाजा लावू बंद घरात पूजा करत असताना, त्यांच्या लुंगीनं अचानक पेट घेतला. पूजा करत असताना देवघर आतून बंद असल्यानं त्यांच्या मदतीसाठी कोणीही आतमध्ये येऊ शकलं नाही.

हेही वाचा-मोठी दुर्घटना; नदीत स्नानासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 12 जणं बुडाले

कुटुंबीय दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करेपर्यंत नलिनाक्षन 80 ते 90 टक्के भाजले. या दुर्दैवी घटनेनंतर त्यांना तातडीनं भायखळा येथील मसीना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण याठिकाणी उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

हेही वाचा-प्रियकराला कामावरुन काढलं म्हणून तरुणीचा संताप, असा उगवला सूड

के. नलिनक्षन हे भारतीय सनदी सेवेतील (आयएएस) 1967 च्या तुकडीचे अधिकारी होते. त्यांनी 1999-2001 या कालावधीत मुंबई महापालिकेत आयुक्तपद भूषवलं होतं. त्याचबरोबर त्यांनी अन्य विभागात देखील उच्च पदावर भरीव कामगिरी केली आहे. पूजा करत असताना लुंगीनं पेट घेतल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Accident, Death, Mumbai