मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

अयोध्या राममंदिर भूमिपूजनानिमित्त माजी मुख्यमंत्री भजनात झाले तल्लीन; पाहा VIDEO

अयोध्या राममंदिर भूमिपूजनानिमित्त माजी मुख्यमंत्री भजनात झाले तल्लीन; पाहा VIDEO

राममंदिर भूमिपूजनानिमित्त आज देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे

राममंदिर भूमिपूजनानिमित्त आज देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे

राममंदिर भूमिपूजनानिमित्त आज देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे

    मुंबई, 5 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील अयोध्या राम मंदिर निर्माणासाठी आज भूमिपूजन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजनानंतर मंदिराच्या उभारणीसाठी पहिली विट ठेवली. या निमित्ताने देशभरात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात असाच एक कार्यक्रम  झाला. यामध्ये भारतीय कार्यकर्त्यांसह अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी त्यांनी भक्ती गीत गायले. यावेळी फडणवीस म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदींना अयोध्येला जावे लागले. त्यांनी सांगितले की मला आश्चर्य वाटतं की जी गोष्ट कोटी लोकांच्या आस्थेशी जोडलेली आहे, त्यावेळी शिवसेना भूमिपूजन करू नका असं सांगत आहे. फडणवीस पुढे म्हणाले की मी आता नेता नाही तर कारसेवक आहे. मला कोणत्याही गोष्टीची पर्वा नाही की लोक मला काय म्हणतील. राममंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने फडणवीस भजनात तल्लीन झाले. राममंदिराच्या उभारणीवर त्यांनी आनंद व्यक्त केला. रामजन्मभूमीत आज ऐतिहासिक सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचं भूमिपूजन केलं. तत्पूर्वी त्यांनी वृक्षारोपण केलं. पूजेअगोदर मोदींनी श्रीरामाला साष्टांग दंडवत घातलं. तो VIDEO सोशल मीडियावर VIRAL होत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Ayodhya ram mandir

    पुढील बातम्या