सेनेचा भाजपला दे धक्का, 'मातोश्री'वर जाऊन माजी सचिव शिवबंधनात!

सेनेचा भाजपला दे धक्का, 'मातोश्री'वर जाऊन माजी सचिव शिवबंधनात!

भाजपमधील अंतर्गत गटबाजीला वैतागून त्यांनी आज शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 27 जानेवारी :  मुंबई महापालिकेची निवडणुकीला (mumbai municipal corporation election 2022) एक वर्षाचा अवधी आहे. परंतु, आतापासूनच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून सत्ताधारी शिवसेनेनं इन्कमिंग सुरू आहे. भाजपचे माजी सचिव समीर देसाई (Sameer Deasi) यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर मुंबई भाजपचे माजी सचिव समीर देसाई यांनी हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. समीर देसाई हे काँग्रेसचे माजी खासदार गुरूदास कामत यांचे भाचे आहेत. तसंच ते काँग्रेसचे माजी नगरसेवकही होते.

झेंडा भल्या कामाचा तो घेऊन निघाला..! QR कोडनंतर डिसले गुरूजी करतायंत हे मोठं काम

काँग्रेसमधून त्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला होता. मात्र, भाजपमधील अंतर्गत गटबाजीला वैतागून त्यांनी आज शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीला एक वर्षाचा अवधी उरला असताना शिवसेनेत आता इन्कमिंग सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मोठ्या कारवाईच्या तयारीत गृह मंत्रालय, शेतकरी संघटनांशी होणार महत्त्वपूर्ण बैठक

तर दुसरीकडे, नवी मुंबईत सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये भाजप नगरसेवकांनी रांग लावली आहे. आतापर्यंत भाजपचे 14 नगरसेवक आणि नगरसेविका पक्षाला रामराम ठोकून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले आहे.  मागील महिन्यातच नवी मुंबईतील भाजपचे 3 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले होते.   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या तिन्ही नगरसेवकांनी शिवबंधन बांधले होते.  नवीन गवते, अपर्णा गवते, दिपा गवते यांनी सेनेत प्रवेश केला होता.

Published by: sachin Salve
First published: January 27, 2021, 1:08 PM IST

ताज्या बातम्या