मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /अनेक वर्षांपासून नवी मुंबईतील नाल्यांमध्ये भटकत होती मगर, अखेर वनविभागानं केली सुटका

अनेक वर्षांपासून नवी मुंबईतील नाल्यांमध्ये भटकत होती मगर, अखेर वनविभागानं केली सुटका

मनपा मुख्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या बेलापूर (Belapur) खाडीत मगर (Crocodile) आढळून आल्यानं  मासेमारी करणाऱ्या स्थानिक मच्छीमारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.अशात अखेर ही मगर मंगळवारी वनविभागाच्या जाळ्यात अडकली आहे.

नवी मुंबई 24 फेब्रुवारी : मनपा मुख्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या बेलापूर (Belapur) खाडीत मगर (Crocodile) आढळून आल्यानं  मासेमारी करणाऱ्या स्थानिक मच्छीमारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. तर सदर मगरीचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग दुर्लक्ष करीत असल्यानं भविष्यात जर कुठला अनुचित प्रकार घडला त्यास जबाबदार कोण असा सवाल स्थानिकांनी केला होता. अशात अखेर ही मगर मंगळवारी वनविभागाच्या जाळ्यात अडकली आहे. विशेष बाब म्हणजे ही मगर गेल्या अनेक दिवसांपासून नवी मुंबईतील नाल्यांमध्ये भटकत होती. अशात अखेर वनविभागानं मंगळवारी तिची सुटका (Rescue) केली आहे.

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात याच खाडीत एक मगर आढळून आली होती. यानंतर मगरीला पकडून इतरत्र स्थलांतरीत करावं अशी मागणी बेलापूर गावातील स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे केली होती. मात्र,  वनविभागानं स्थळ पाहणी करून देखील मगर पकडण्यासाठी  कुठलीच कारवाई केली नव्हती. त्यामुळे, याठिकाणी मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांमध्ये व स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. अशात वनविभागानं या मगरीला पकडल्यानं नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

बेलापूर परिसरात दिसून आलेली ही मगर 6.43फूट लांब होती तर 35.4 किलोग्राम वजनाची होती. ही मगर अनेक वर्षांपासून मुंबईतील नाल्यांमध्ये भटकत होती.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मगरीचे अनेक व्हिडीओ आणि फोटोही याआधी अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे या काळात या मगरीनं कोणालाही नुकसान पोहोचवलं नाही. सोमवारी रात्री 11 वाजता या मगरीला पकडण्यासाठी जाळं लावण्यात आलं होतं. यानंतर मंगळवारी सकाळी ही मगर वनविभागाच्या जाळ्यात अडकली.

First published:
top videos

    Tags: Crocodile, Mumbai, Rescue operation