धक्कादायक! मुंबईत ब्राझीलच्या महिलेवर बलात्कार

मुंबईत परदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 08:54 AM IST

धक्कादायक! मुंबईत ब्राझीलच्या महिलेवर बलात्कार

मुंबई, विवेक गुप्ता, 22 मे : महानगरी मुंबईत एक धक्क्दायक घटना घडली आहे. कुलाबा भागात एका परदेशी महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. परदेशी महिलेवर झालेल्या बलात्कराच्या घटनेनं मुंबईत पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पीडित महिला ही ब्राझील देशाची नागरिक असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईत फिरण्यासाठी आलेल्या महिलेची ओळख पद्याकर या तरूणाशी झाली. ब्राझीलची महिला फिरण्यासाठी मुंबईत आली असली तरी तिला मुंबईची फारशी माहिती नव्हती. या गोष्टीचा फायदा घेत पद्याकरनं तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित महिलेनं कफ परेड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

प्राथमिक चौकशीअंती महिलेच्या तक्रारीमध्ये तथ्य आढळलं. त्यानंतर पोलिसांनी पद्याकर या तरूणाला बेड्या ठोकल्या. दरम्यान, या साऱ्या प्रकरणात पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.


SPECIAL REPORT : उत्तर प्रदेशमध्ये 'हाती-सायकल' पडणार कमळावर भारी?

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: mumbaiRape
First Published: May 22, 2019 08:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...