मुंबई आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2017 03:33 PM IST

मुंबई आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

22 जुलै : पुढच्या पाच दिवसात उत्तर आणि दक्षिण कोकणात, तसंच मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्यानं व्यक्त केलाय. मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता  आहे, मराठवाड्यात तुरळक सरींचा अंदाज आहे.

मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासूनच पावसाचा जोर कायम आहे. पहाटेपासूनच ठाणे कल्याणच्या ग्रामीण पट्ट्यात मुसळधार पाऊस पडतोय.  या पावसाचा शहरातील वाहतुकीवर विशेष परिणाम झालेला नाही. मात्र पावसाचा जोर असाच कायम राहिला तर लोकल सेवा काही प्रमाणात प्रभावित होऊ शकते.

पाणलोट क्षेत्रात गेले चार दिवस चांगला पाऊस झाल्यामुळे राज्यातली धरणं फुल्ल झालीत. खडकवासला धरण साखळीतल्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झालीये. खडकवासला पूर्ण क्षमतेन भरल्याने दुपारी १२ वाजेपर्यंत १४ हजार क्युसेक वेगाने पाणी मुठा नदीत सोडण्यात आलंय.

कोल्हापूरचं  राधानगरी धरणही 92% भरलंय. राधानगरी धरणाची पाणीपातळी सध्या 8 TMC एवढी असून ते पूर्णपणे भरण्यासाठी 347.50 इतकी क्षमता लागते. या धरणाची आताची पाणीपातळी आहे 343.64 एवढी. त्यामुळे हे धरण कोणत्याही क्षणी भरून वाहू शकतं त्यासाठी त्याचे 7 स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. या धरणातून सध्या वीजनिर्मितीसाठी 2200 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यतील 24 पैकी 17 धरणं ही 50 टक्क्यांहून अधिक भरली आहेत. जिल्ह्यातील गंगापूर,नांदूरमध्यमेश्वर,दारणा,भावली धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय. नाशिकच्या गंगापूर धरणातून देखील पाणी सोडण्यात आल्यानं गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर सदृश परिस्थिती निर्माण झालीय..प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2017 03:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...