S M L

काकांचा 'नियम' पुतण्याला लागू, 'या' कारणांमुळे समीर भुजबळांची सुटका

आज समीर यांना जामीन मंजूर झाला असला तरीही त्यांना कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करुन जेलमधून बाहेर येण्यास उद्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. समीर सध्या आर्थर रोज जेलमध्ये आहेत.

Sachin Salve | Updated On: Jun 6, 2018 05:38 PM IST

काकांचा 'नियम' पुतण्याला लागू, 'या' कारणांमुळे समीर भुजबळांची सुटका

मुंबई, 05 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे. छगन भुजबळ यांना जामीन मंजूर करण्यात आला त्याच आधारावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

तसंच ज्या गुन्ह्यांसाठी समीर यांच्यावर खटला सुरू आहे त्याची जास्तीत जास्त शिक्षा ७ वर्षं आहे आणि त्यापैकी १/३ काळ समीर यांनी तुरुंगात काढला आहे. या दोन्ही कारणांमुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात आला असल्याचं हायकोर्टानं म्हटलं आहे. समीर यांना ५ लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन देताना कोर्टाने त्यांना महाराष्ट्राबाहेर जाता येणार नाही तसंच प्रत्येक सुनावणी वेळी कोर्टात हजर राहावं लागेल अशा अटी घातल्या आहेत. आज समीर यांना जामीन मंजूर झाला असला तरीही त्यांना कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करुन जेलमधून बाहेर येण्यास उद्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. समीर सध्या आर्थर रोज जेलमध्ये आहेत.

'या' कायद्यातील बदलामुळे जामीन


नोव्हेंबर २०१७ मध्ये सुप्रीम कोर्टाने पीएमएलए कायद्यातील कलम ४५ घटनात्मकदृष्ट्या अवैध ठरवलं होतं. त्याच धर्तीवर छगन भुजबळ यांनी जामीन अर्ज केला आणि तो मंजूर करण्यात आला. तसाच जामीन अर्ज समीर यांनी देखील केला आहे. पीएमएलए कायद्यात २९ मार्च रोजी दुरुस्ती करण्यात आली असून त्यामुळे आता समीर यांना जामीन देता येणार नाही असा ईडीचा युक्तीवाद केला होता. पण अखेर याच कायद्याचा बदलामुळे समीर भुजबळ यांनाही तुरुंगाचे दार मोकळे झाले आहे.

हे पण वाचा !

Loading...

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी 'ईडी'कडून समीर भुजबळांना अटक

चौकशी करा, पण अटक करणं अयोग्य - भुजबळ

छगन भुजबळ 10 जूनला पुण्यात करणार भाषण

पंकज भुजबळांनी घेतली मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट

भुजबळांची 'दुसरी इनिंग', भायखळ्यात घेणार सोमवारी सभा

भुजबळ जामिनावर सुटले, पुढे काय ?

अटक ते जामीन, भुजबळांच्या तुरुंगवारीचा प्रवास

या आरोपाखाली समीर भुजबळांना अटक

- समीर भुजबळांची अटक त्यांच्याच कंपन्यांमधल्या कथित अफरातफरीमुळे

- भुजबळ कुटुंबीयांच्या 11 कंपन्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार ईडीला संशय

- आर्मस्ट्राँग प्युअर वॉटर, आर्मस्ट्राँग एनर्जी, शिराज वाईनयार्ड्स, इदीन फर्निचर

- व्हर्चुअल टूर्स, सुवी रबर, इंटलेक्चुअल मॅनेजमेंट कन्सलटंट्स

- भावेश बिल्डर्स, पर्वेश कन्स्ट्रक्शन, नीश इन्फ्रास्ट्रक्चर, देविशा इनफ्रास्ट्रक्चर

- अटक केल्यानंतरच काही कंपन्यांची कागदपत्रं सुपूर्द केली

- 2 महत्त्वाच्या कंपन्यांची कागदपत्रं  सुपूर्द केली नाही

- अनेक कंपन्यांचं वास्तवात काहीच काम नाही, फक्त आर्थिक देवाणघेवाण

- सर्व कंपन्यांमधून अत्यंत क्लिष्ट पद्धतीने पैसे फिरवण्यात आलेत

- महत्त्वाच्या कंपन्यांच्या भागधारक कंपन्या केवळ कागदावरच

- भागधारक कंपन्यांबद्दल काहीच ठाऊक नसल्याचा समीर भुजबळांचा दावा

- समीर भुजबळ चौकशीत सहकार्य करत नसल्याचा ईडीचा आरोप

- समीर भुजबळ जाणीवपूर्वक महत्त्वाची तथ्यं लपवत असल्याचा ईडीचा आरोप

- कोट्यवधी रुपयांची संपत्ती मुळात निर्माण कुठे झाली, हे सांगत नसल्याचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 6, 2018 05:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close