मनसेच्या 6 नगरसेवकांसाठी सेनेकडून मनी लाँड्रिंग, सोमय्यांचा आरोप

पुष्कक बुलियन या कंपनीचे चंद्रकांत पटेल यांच्यामार्फत हा व्यवहार झाला, असा आरोप त्यांनी केलाय.

Sachin Salve | Updated On: Oct 16, 2017 12:18 PM IST

मनसेच्या 6 नगरसेवकांसाठी सेनेकडून मनी लाँड्रिंग, सोमय्यांचा आरोप

16 आॅक्टोबर :  शिवसेनेनं मनसेचे सहा नगरसेवक फोडले. त्यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले हा सगळा व्यवहार मनी लाँड्रिंगमधून घडलाय असा गंभीर आरोप भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी केलाय.

मनसेचे 6 नगरसेवक नुकतेच शिवसेनेत गेले. हे करत असताना त्यांच्यामध्ये आणि शिवसेनेमध्ये डील झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय. आता सोमय्या यांनी एसीबी आणि ईडीकडे तक्रार केलीये. सोमय्यांनीयाबाबत ईडीला माहितीही दिलीये. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे, मी ईडीला पुरावेही दिलेत, असं सोमय्यांनी सांगितलंय. पुष्कक बुलियन या कंपनीचे चंद्रकांत पटेल यांच्यामार्फत हा व्यवहार झाला, असा आरोपही त्यांनी केलाय.

याआधीही  मनसेच्या 6 नगरसेवकांना प्रत्येकी 3 कोटी रुपये देऊन फोडलं गेल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी लाचलुचपत विभाग, कोकण आयुक्त आणि पोलिसांकडे लेखी तक्रारही केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 16, 2017 12:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close