राज्यपाल पहिल्यांदाच बोलले...कंगना, पहाटेचा शपथविधी आणि मुख्यमंत्र्यांचे बाहेर न पडणे

राज्यपाल पहिल्यांदाच बोलले...कंगना, पहाटेचा शपथविधी आणि मुख्यमंत्र्यांचे बाहेर न पडणे

'पहाटेला रामप्रहर म्हणतात, मग कोणी पहाटे शपथ घेतली तर 'प्रहार' का करतात?'

  • Share this:

मुंबई 11 सप्टेंबर:  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari) यांचे गेल्या एक वर्षभरातील कार्यक्रम, दौरे आणि भेटीगाठींच्या फोटोंचं संकल असलेल्या पुस्तकाचं आज राजभवनात प्रकाशन झालं. ‘जन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी’ असं हे पुस्तक आहे. या कार्यक्रमानंतर राज्यपालांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी सध्या सुरू असलेल्या अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. यात त्यांनी कधी सूचक विधान केलं तर कधी टोले लगावले. राज्यपालांनी अशा सगळ्या विषयांवर बोलणं हे तसं दुर्मिळ मानलं जातं त्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झालंय. राज्यपाल म्हणाले, मी राज्यसेवक आहे राज्यपाल नाही.

राज्यपाल आणि शासन यात मतभेद

राज्यपाल आणि सरकारमध्ये मतभेद नाहीत पण दोन भांडी असेल तर काही  तर वाजणारं. माझे मतभेद नाहीत सगळेच माझे मित्र आहेत.

नेत्यांची टीका

ज्या लोकांनी माझ्यावर टीका केली ते मोठे आहेत.त्यांच्यावर काय बोलणार. आपली जीभ दाताखाली आली तर जीभ तोडत नाहीत. आपलीच माणसे आपल्यावर बोलले तर नाराजी कशाला. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि संजय राऊत यांनी राज्यपालांच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर त्यांनी हे वक्तव्य केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात कोरोनाचं संकट असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात फिरत नाहीत अशी टीका केली जाते असा प्रश्न विचारल्यावर राज्यपाल म्हणाले, आपल्याला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही.  काय होतं आहे ते महत्वाचं. मी कुणाच्या कामात हस्तक्षेप करत नाही. कोणी विचारलं तर सल्ला देण्याचं काम करतो असं मत मांडले.

मुख्यमंत्री अथवा मंत्री यांनी एकदा विषय नाकारला असेल तर त्यास न्याय देण्याच काम राज्यपाल कडे असतं. राज्यपाल सुनावणी करतात. माझ्याकडील प्रलंबित विषय पुढील काळात संपवेल. असे सांगत राज्यपाल यांनी भविष्यात राज्यात अधिक सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत.

कंगना प्रकरण

राज्यपाल यांनी कंगना प्रकरण पहिल्यांदा भाष्य केले.  ते म्हणाले, माझं ह्याच्याशी काही देणंघेणं नाही  मी कधी नाराज होतो असे मी म्हटले नाही. जे नाराज असतील त्यांनी ते छापले असेल असे सांगत राज्यपाल नाराज असलेल्या बातमीचं खंडन केले.

राज्यपाल नियुक्त आमदार

या विषयावर सुद्धा राज्यपालांनी स्पष्ट मत मांडत महाविकास आघाडी नेत्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मुद्दे ही सुस्त, गवाह चुस्त, ज्यांना नाव पाठवायचं आहे ते नाव पाठवत नाही आणि राज्यपालांना शिव्या देणार हे बरोबर नाही.

पहाटेचा शपथविधी

राज्यपालांनी पहिल्यांदाच थेटपणे या प्रकरणावर भाष्य केलं.  पहाटेला रामप्रहर म्हणतात, मग कोणी पहाटे शपथ घेतली तर 'प्रहार' का करतात?

Published by: Ajay Kautikwar
First published: September 11, 2020, 8:16 PM IST
Tags: governer

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading