Home /News /mumbai /

पहिल्यांदाच अजित पवारांवर विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी, काय मांडली भूमिका? 

पहिल्यांदाच अजित पवारांवर विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी, काय मांडली भूमिका? 

मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्रिपदाप्रमाणेत विरोधी पक्ष नेते पद अत्यंत महत्त्वाचं असतं. पहिल्यांदाच अजित पवार विरोधी पक्ष नेते भूषवणार आहे.

    मुंबई, 4 जुलै : विरोधी पक्ष नेते पदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्रिपदाप्रमाणेत विरोधी पक्ष नेते पद अत्यंत महत्त्वाचं असतं. पहिल्यांदाच अजित पवार विरोधी पक्ष नेते भूषवणार आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचं कौतुक केलं. यादरम्यान अजित पवारांनीही आपलं भाषण दिलं. काय म्हणाले अजित पवार... 1991 साली पहिल्यांदा मी विधानसभेत आलो. शरद पवारांमुळे मला जवळून राजकारण पाहता आलं. आज माझ्याकडे विरोधी पक्ष नेते पद सोपवण्यात आलं आहे. विरोधी पक्ष नेते पदाची उज्ज्वल परंपरा विधानसभेला मिळाली आहे. मी जेव्हा निवडून आलो तेव्हा मनोहर जोशींना विरोधी पक्ष नेतेपदाच्या खुर्चीवर पाहिलं. लोकशाहीमध्ये जसं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपद महत्त्वाचं असतं तसचं विरोधी पक्ष नेतेपदही महत्त्वाचं असतं. अनेकदा विरोधी पक्ष नेत्याने अशी काही भूमिका मांडली, ज्यावेळी सरकारदेखील हादरलं आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी जनतेच्या कल्याणाच्या मुद्द्यावर चर्चा आणण्याचं काम केलं. आम्ही सत्तेत आल्यानंतर एक अधिवेशन झालं. त्यानंतर मार्चमध्ये कोरोना झाला. त्यानंतर मात्र व्यवस्थित असं अधिवेशन झालं नाही. एकनाथ शिंदेंची गाडी सुसाट.. यावेळी अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंच्या भाषणाचं कौतुक केलं. आतापर्यंत शिंदेंचं असं भाषण कधी ऐकायला मिळालं नसल्याचं ते यावेळी म्हणाले. शिंदे बोलत असताना शेजारी बसलेले उपमुख्यमंत्री त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना धाकधूक होत होती. मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या भाषणातून काहीतरी चुकीचा शब्द जाऊ नये अशी फडणवीसांना भीती होती.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Ajit pawar, Eknath Shinde, NCP

    पुढील बातम्या