Home /News /mumbai /

मुंबईत फोर्ट भागात इमारतीचा भाग कोसळला, रेस्क्यू ऑपरेशन सुरु

मुंबईत फोर्ट भागात इमारतीचा भाग कोसळला, रेस्क्यू ऑपरेशन सुरु

Building collapsed: मुंबईतल्या पुन्हा एकदा एका इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. ही पाच मजली इमारत आहे. सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

    मुंबई, 25 जूनः दक्षिण मुंबईतल्या पुन्हा एकदा एका इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. फोर्ट भागात 5 मजली इमारतीचा भाग कोसळला आहे. आशापुरा असं इमारतीचं नाव आहे. इमारतीत स्लॅब कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी ही घटना घडली आहे. या इमारतीचं दुरुस्तीचं काम सुरु होतं. ही पाच मजली रहिवाशी इमारत आहे. 40 लोकांना आतापर्यंत रेस्क्यू करण्यात आलं आहे. सुदैवानं या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Mumbai, Mumbai News

    पुढील बातम्या